Ulhasnagar | महिलेला कारची धडक, चालकाकडून चक्कर येऊन पडल्याचा बनाव, CCTV मुळे अपघाताचा खुलासा

उल्हासनगरात काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला जखमी (Ulhasnagar Accident Case Revealed) अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:19 PM, 23 Feb 2021
Ulhasnagar | महिलेला कारची धडक, चालकाकडून चक्कर येऊन पडल्याचा बनाव, CCTV मुळे अपघाताचा खुलासा
Ulhasnagar Accident

उल्हासनगर : उल्हासनगरात काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला जखमी (Ulhasnagar Accident Case Revealed) अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ती रस्त्यात चक्कर येऊन पडल्याचा बनाव करण्यात आला होता. मात्र, ती महिला चक्कर येऊन पडली नसून तिलवा कारने धडक दिल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही घटना उघडकीस आली आहे (Ulhasnagar Accident Case Revealed).

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला कारची धडक

मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेला एका कारनं धडक देत जखमी केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे हा सगळा प्रकार समोर आला आहे.

Ulhasnagar Accident

Ulhasnagar Accident

उल्हासनगरात राहणाऱ्या वैशाली जगताप ही महिला काही दिवसांपूर्वी मॉर्निंग वॉक करण्यासाठी पहाटे घराबाहेर पडल्या. यावेळी भाटिया चौक परिसरात त्यांना एका भरधाव कारने धडक दिली. यानंतर कार चालकानेच त्यांना धिवणेरी रुग्णालयात दाखल केलं आणि त्यांच्या कुटुंबियांना त्या चक्कर येऊन रस्त्यात पडल्याची माहिती दिली.

मात्र, काही दिवसांनी या महिलेची प्रकृती खालावली आणि महिलेला दुसरीकडे हलवण्याची वेळ आली. यावेळी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, त्यात या महिलेला कारने उडवलं असल्याचं समोर आलं. त्यानंरार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत विनोद लालवानी या कार चालकाला अटक केली आहे (Ulhasnagar Accident Case Revealed).

Ulhasnagar Accident Case Revealed

संबंधित बातम्या :

हाताला तेल लावून दाराचा कोयंडा तोडला, 7 तोळे सोन्यासह साडे चार लाख लंपास, चोरटे सीसीटीव्हीत कैद

नागपुरात ड्रग्ज तस्करीच्या रॅकेटचा भांडाफोड, दोघांना अटक, पावणे सहा लाखांचे ड्रग्ज जप्त

धक्कादायक ! कुत्र्याने घाण केल्यामुळे राग अनावर, महिलेवर थेट कुऱ्हाडीने हल्ला