‘माझ्याशी भांडतेस काय? थांब बघतोच!’ जुळ्या मुलांदेखत नवऱ्याने बायकोला भोसकलं! जागीच ठार

Husband killed wife : पतीपत्नींचे सतत खटके उडत होते. आठ जूनला भांडण वाढत गेला. पतीला राग अनावर झाला.

'माझ्याशी भांडतेस काय? थांब बघतोच!' जुळ्या मुलांदेखत नवऱ्याने बायकोला भोसकलं! जागीच ठार
धक्कादायक..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 10:12 AM

नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जुनागडमध्ये नवऱ्यानं आपल्या बायकोचा खून (Husband killed wife) केला. भांडण झाल्याच्या रागातून नवऱ्यानं बायकोला धारदार शस्त्रानं भोसकलं आणि तिचा जीव घेतला. ही घटना जुनागडमध्ये घडली. यामुळे जुळ्या मुलांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरपलंय. आठ जून रोजी हे हत्याकांड घडलं. यानंतर हत्या (Murder case) करणारा नवरा घराला लॉक लावून पळून गेलाय. पण त्याआधी त्यानं आपल्या बायकोचा मृतदेह (Murder mystery) पाण्याची टाकीत फेकला. त्यानंतर घरात घेऊन कपडे बदलले आणि तो पळून गेला.

भांडणातून हत्या…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनागडच्या जवळ असलेल्या खडीया गावात ही धक्कादायक घटना घडली. रामदे नावाचा इसम आपल्या पत्नी लिली आणि दोघा जुळ्या मुलांसोबत राहत होता. दोघा पतीपत्नींचे सतत खटके उडत होते. आठ जूनला भांडण वाढत गेला. पतीला राग अनावर झाला.

राज्याच्य राजकारणातली महत्त्वाची बातमी : पाहा व्हिडीओ

हे सुद्धा वाचा

यानंतर पत्नीला जीवे मारण्यापर्यंत पतीची मजल पोहोचली. हत्या केल्यानंतर पती थांबला नाही. यानंतर त्याने पत्नीची डेडबॉर्ड थेट पाण्याच्या टाकीत फेकून दिली होती. कुणाला काही कळू नये म्हणून माथेफिरु नवरा घराला लॉक लाईन घरातून निघून गेला होता.

कळलं कसं?

ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. रामदेचा भाजा जयराम ढोला आपल्या म्हशींना बांधण्यासाठी घरी आला तेव्हा त्याला संशय आला. काका घरी नाहीये, घराला टाळं लागलंय हे पाहून जयरामचा संशय अधिकच बळावला. त्याने लगेच सरपंच आणि पोलिसांनी याबाबत सांगितलं. पोलिसांनी घर गाठून टाळं तोडलं आणि आत पाहिलं तर लिलिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत पडलेला होता.

पोलिसांनी तातडीनं हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी तीन धारदार शस्त्रही सापडली आहे. लिलीचा हत्यारा असलेल्या पती रामदेचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.