घटस्फोट मागताच नवऱ्याने शेअर केले खासगी फोटो, रडतरडत बायकोने… नेमकं काय घडलं?
पोलिसांनी एका व्यक्तीला त्याच्या पत्नीचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. पत्नीने रडतरडत पोलिसात तक्रार दाखल केली होती. नेमकं काय झालं वाचा....

पोलिसांनी एका व्यक्तीला त्याच्या पत्नीचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. आरोपीचे नाव गोविंदराजू सी वय २७ वर्षे आहे आणि एका खासगी रिअल इस्टेट कंपनीत फायर अँड सेफ्टी सुपरवायझर म्हणून नोकरी करतो. तक्रार करणाऱ्या महिलेचे वय २३ वर्षे असून ती त्याची पत्नी आहे. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया त्याविषयी…
पोलिसांच्या म्हणण्यानुसार दोघांची भेट येलहंका येथील एका मॉलमध्ये काम करताना झाली होती. तिथेच मैत्री झाली आणि २०२४ मध्ये दोघांनी लग्न केले. पण लग्नानंतर काही महिन्यांतच समस्या सुरू झाल्या. गोविंदराजू आपल्या पत्नीची कमाई ऑनलाइन सट्टेबाजी (ऑनलाइन बेटिंग) मध्ये खर्च करू लागला. यामुळेच दोघांमध्ये वारंवार भांडणे होऊ लागली. पत्नीला अनेक वेळा मानसिक त्रास देण्यात आला. वैतागून ती बेंगळुरू सोडून आंध्र प्रदेशात आपल्या आई-वडिलांकडे निघून गेली. पण तिथेही तिच्या समस्या संपल्या नाहीत. नवरा वारंवार फोन करून धमकावू लागला की, जर तिने त्याचे ऐकले नाही तर तो तिचे वैयक्तिक आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकेल. तिची प्रतिष्ठा खराब करेल.
आपली प्रतिमा खराब होण्याच्या भीतीने महिला परत बेंगळुरूला आली आणि एका पीजीमध्ये राहू लागली. पण आरोपी तिथेही पोहोचला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो वारंवार तिथे जाऊन महिलेला मानसिक छळ करत होता, धमकावत होता आणि सांगत होता की जर तिने घटस्फोट घेतला तर तो आत्महत्या करेल आणि तिला त्यासाठी जबाबदार ठरवेल.
११ मित्रांना टॅग करून फोटो व्हायरल केले
महिलेला हे सर्व सहन झाले नाही. तिने पुन्हा घटस्फोट मागितला. यामुळे संतापलेल्या गोविंदराजूने तिचा बदला घेण्यासाठी तिचे वैयक्तिक फोटो Threads अॅपवर शेअर केले आणि तिला तिच्या ११ मित्रांना टॅग करून दिले. हा तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता. जेव्हा तिच्या मित्रांनी फोन करून सांगितले की तिचे वैयक्तिक फोटो व्हायरल झाले आहेत, तेव्हा पीडितेने ताबडतोब पोलिसांत तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला.
प्रकरणाची चौकशी सुरू
बंगळूरुमधील अमरुतहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि आरोपीला त्याच दिवशी ताब्यात घेतले. हे प्रकरण आयटी कायद्याच्या कलम ६७ आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ८५ अंतर्गत नोंदवले गेले. नंतर आरोपीला स्टेशन बेलवर सोडण्यात आले. सध्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
