AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहिणीच्या नणंदेसोबत करायचे होते लग्न, पण भावोजी विरोध करत होता; मग मेव्हण्याने थेट भावोजीलाच…

तरुणाचे बहिणीच्या घरी येणे-जाणे होते. यादरम्यान त्याचे बहिणीच्या नणंदेसोबत प्रेमसंबंध जुळले. मात्र भावोजी याला विरोध करत होता. मग मेव्हण्याने जे केले त्याने सर्व हादरले.

बहिणीच्या नणंदेसोबत करायचे होते लग्न, पण भावोजी विरोध करत होता; मग मेव्हण्याने थेट भावोजीलाच...
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटाImage Credit source: Google
| Updated on: Apr 11, 2023 | 9:44 PM
Share

औरंगाबाद : बहिणीच्या नणंदेवरच तरुणाचा जीव जडला. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते, मात्र भावोजीचा याला विरोध होता. याच कारणातून संतापलेल्या मेव्हण्याने भावोजीचा काटा काढल्याची घटना बिहारमधील औरंगाबादमध्ये घडली आहे. भावोजीने त्याची बहिण दिली नाही, म्हणून तरुणाने आपल्याच बहिणीचा संसार उद्धवस्त केल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मुनील राम असे हत्या करण्यात आलेल्या भावोजीचे नाव आहे. संतोष राम असे आरोपी आरोपीचे नाव असून, त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

भावोजीला आधी भरपूर दारु पाजली मग संपवले

संतोष रामचे आपल्या बहिणीच्या घरी येणे जाणे होते. यादरम्यान त्याचे बहिणीच्या नणंदेशी सूत जुळले. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते, त्यामुळे ते पळून गेले. पण घरच्यांनी दोघांना पकडून घरी परत आणले. भावोजीचा या नात्याला विरोध होता. याचबाबत भावोजी आणि बहिण संतोष रामच्या घरी आले होते. यावेळी रात्री संतोषने भावोजीला भरपूर दारु पाजली आणि मग त्याची हत्या केली.

हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. मृताच्या पत्नीने चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस छापेमारी करत आहेत. आरोपींध्ये संतोषसह त्याच्या तीन मित्रांचा सहभाग आहे. मयताच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार, तिचा भाऊ संतोष आणि पती मुनील रात्री उशिरा घरी आले. सकाळी पत्नी मुनीलला उठवण्यास गेली असता त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पत्नीने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. मयत मुनीलच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

Follow Us
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल
विदर्भ भयंकर तापला, उष्णतेच्या लाटेने घराबाहेर पडणं मुश्किल.
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद
गॅस सिलेंडरच्या मुद्द्यावरून लोकसभेत जोरदार पडसाद.
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स....
घरगुती गॅसला प्राधान्य; व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा ठप्प, हॉटेल्स.....
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी
महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी.