चोरट्यांची हिंमत तर पहा, चक्क पोलीस ठाण्यासमोरच आजीबाईंना लुटले !

वृद्धांना लुटण्याच्या घटनांमध्ये हल्ली मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र आता चोरट्यांनी चक्क पोलीस स्टेशनसमोरच लुटण्याची हिंमत केलीय. यामुळे पोलीस प्रशासनावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

चोरट्यांची हिंमत तर पहा, चक्क पोलीस ठाण्यासमोरच आजीबाईंना लुटले !
कल्याणमध्ये रेस्टॉरंट मॅनेजरवर हल्लाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 17, 2023 | 1:05 AM

सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : वृद्ध महिलांना लुटणाऱ्या टोळीने कल्याण पूर्व परिसरात पुन्हा डोके वर काढले आहे. सोन्याचे दागिने घालणाऱ्या वृद्ध महिलांना हेरून त्यांना बोलण्यात गुंतवले जाते आणि त्यांच्याकडून सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला जातो. ही मोडस ऑपरेंडी असलेल्या टोळीने शुक्रवारी काटे मालवणी मानेवली परिसरात एका वृद्ध महिलेला टार्गेट केल्याचे उघडकीस आले आहे. 60 वर्षीय वृद्ध महिला रिक्षातून घरी परतत असताना लुटारूंपैकी दोघा जणांनी वृद्धेला बोलण्यात गुंतवून तिच्याकडील दागिने लुटले आणि तेथून पळ काढला. कमलादेवी रामसेवक कुशवाह असे चोरट्यांनी दागिने लुटलेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा दागिने लुटारूंच्या टोळीविषयी दहशत निर्माण झाली आहे.

वृद्ध महिलेसोबतच रिक्षात बसले होते लुटारू

काटे मानिवली परिसरातील आनंदवाडीमध्ये राहणाऱ्या कमलादेवी रामसेवक कुशवाह या शुक्रवारी दुपारच्या सुमारास काटे मानिवली चौकातून शेअर रिक्षाने घरी येत होत्या. रिक्षा नितीनराज हॉटेलजवळ आल्यावर कमलादेवी यांनी चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र यावेळी रिक्षात सोबत असलेल्या दोन अनोळखी प्रवाशांनी चालकाला तेथे रिक्षा थांबवू न देता पुढे नेण्यास सांगितले. त्यानंतर कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या समोर आल्यावर रिक्षा थांबवण्यास सांगितले. तेथे दोघे अनोळखी प्रवासी रिक्षातून उतरले. तोपर्यंत त्यांच्या वागण्याबद्दल रिक्षाचालकालाही कुठलाही संशय आला नव्हता. त्यांनी रिक्षात बसलेल्या कमलादेवी यांनाही तेथेच उतरण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा

‘अशी’ केली लूट

कमलादेवी यांनी रिक्षातून उतरल्यानंतर घरचा रस्ता पकडला होता. त्यांना लुटण्याच्या हेतूने प्लानिंग केलेल्या दोघा लुटारुंनी कमलादेवी यांच्या मागोमाग जाण्यास सुरुवात केली. कमलादेवी यांना सुरुवातीला कुठलाही संशय येऊ नये म्हणून दोघांनी त्यांना पुढे जाण्यास सांगितले. नंतर थोड्याच वेळात कमलादेवी यांना थांबवण्यात आले आणि पुढच्या परिसरात दागिन्यांची तपासणी केली जात असल्याची भीती घालण्यात आली.

पुढे तपासणी सुरू आहे, तुमच्याजवळ असलेले सर्व सोन्याचे दागिने काढून पिशवीत ठेवा, असे त्या दोघा जणांनी कमलादेवी यांना सांगितले. विशेष म्हणजे त्यावेळीही वृद्ध कमलादेवी यांना कुठलाही संशय आला नव्हता. त्यांनी कानातील 10 ग्रॅम वजनाचे जवळपास 30 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे टॉप्स आणि वेल काढून हातात घेतले. त्याचदरम्यान त्या दोन अनोळखी इसमांपैकी एकाने ते दागिने पाहण्यास घेतले.

याचवेळी दुसऱ्या साथीदाराने कमलादेवी यांना बोलण्यात गुंतवले. काही कळायच्या आतच दोघा भामट्यांनी कमलादेवी यांच्याकडील दागिने लंपास करून तिथून पळ काढला. हा सर्व प्रकार कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या समोर घडला. दागिने गमावून बसलेल्या कमलादेवी यांनी थोड्याच अंतरावरील पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस त्या फरार भामट्यांचा शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.