AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेल्फीनंतर आता रील्सचं फॅड, दोन तरुणांच्या शूटिंग दरम्यान दुचाकीला धडक, नंतर जे घडलं ते भयंकर होतं…

खरंतर गेल्या काही महिन्यांपासून सेल्फी नंतर आता रील्स फॅड तरुणाईमध्ये दिसू लागले आहे. मात्र, याच काळात पुण्यात धक्कादायक घटना घडली असून प्रकरण पोलिस ठाण्यात गेलं आहे.

सेल्फीनंतर आता रील्सचं फॅड, दोन तरुणांच्या शूटिंग दरम्यान दुचाकीला धडक, नंतर जे घडलं ते भयंकर होतं...
Image Credit source: Google
| Updated on: Mar 08, 2023 | 3:52 PM
Share

अभिजीत पोते, टीव्ही 9 मराठी, पुणे : गेल्या काही महिन्यांपासून सेल्फीनंतर आता रील्सचं ( Reels ) फॅड आलं आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे रील्स बनविण्याचे प्रकार दिसून येत आहे. त्यामध्ये पुण्यातून एक धक्कादायक प्रकार ( Pune Crime News ) समोर आला आहे. भररस्त्यावर रील्स बनवत असताना मोटारसायकलने, बाजूने चालेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अपघातात महिलेचा मृत्यु झाला आहे. पुण्यातील महमदवाडी या ठिकाणी ही घटना मंगळवारी संध्याकाळी साडे पाच वाजता घडली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव तस्लिमा पठाण असे आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोन तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रील्स करणारे कोण ?

आयान शेख आणि झायद शेख या २ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आहे. पुणे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यामध्ये आयान आणि झायद दोघेही बाइकवर स्टंट करत होते. त्याच वेळी बाजूने चाललेल्या महिलेला आयान याच्या दुचाकीची धडक बसली. हे दोघेही तरुण स्टंट करून व्हिडिओ बनवतात आणि सोशल मिडियावर अपलोड करतात.

अपघात कसा घडला ?

सोशल मिडियावर रील्सचे व्हिडिओ शेयर करण्यासाठी दुचाकीवरुन आयान आणि झायद हे वेगवेगळ्या दुचाकी वरुन जात होते. त्याच वेळी एक जण स्टंट करत होता आणि दूसरा व्हिडिओ काढत होता. त्याच वेळी तस्लिमा पठाण या बाजूने जात असतांना लक्षात न आल्याने आयन स्टंट करत असतांना त्याने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्याच वेळी त्या खाली कोसळल्या आणि त्यांचा जागेवर मृत्यू झाला. त्यानंतर दोघांनी तिथून पळ काढला होता.

घटणेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर दोघा संशयितांना गजाआड करण्यात आले असून त्यांच्या दुचाकी देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहे. अधिकचा तपास केला जात असून तपासात काय समोर येतं हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.