AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन महिन्याच्या चिमुरडीची बापाकडून हत्या, इंदापुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना

पहाटेच्या वेळी बापानेच दोन महिन्याच्या चिमुरडीचा नाक आणि तोंड दाबून हत्या केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडलाय. 

दोन महिन्याच्या चिमुरडीची बापाकडून हत्या, इंदापुरातील हृदय पिळवटून टाकणारी घटना
| Updated on: Dec 18, 2020 | 7:28 PM
Share

इंदापूर (पुणे) : “ही माझी मुलगी नाही… तू आज माझ्या मागे ऊस तोडलेल्या मोळ्या बांधायला का आली नाहीस?”, असं म्हणत बायकोशी भांडणं करीत पहाटेच्या वेळी बापानेच दोन महिन्याच्या चिमुरडीचा नाक आणि तोंड दाबून हत्या केल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडला.  (Indapur father killed his 2 month old daughter)

शक्तिमान काळे या हैवान बापाने दोन महिन्याच्या चिमुरडीची नाक आणि तोंड दाबून हत्या केली. याप्रकरणी चिमुरडीची आई सोनमने इंदापूर पोलिसांत तक्रार दाखल केलीय. 22 नोव्हेंबरला हैवान बापाने चिमुरडीची हत्या केली. पोटची पोरगी गेलीये, या दुखा:तून आई सावरली नव्हती. अखेर 17 डिसेंबरला हा सगळा प्रकार चिमुरडीच्या आईने पोलिसांसमोर कथन केला.

ऊस तोडणीच्या कामानिमित्त काळे कुटुंब इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे सध्या ऊस तोडणीचे काम करीत आहेत. सोनम हिचा नवरा सकटया उर्फ शक्तिमान काळे याने दिनांक 22 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री आठ वाजता करेवाडी येथील कोपीवर आला असता, त्याने त्याच्या बायकोसोबत भांडणे सुरु केली. “ही मुलगी माझी नाही, आज तू माझ्या मागे ऊस तोडलेल्या मोळ्या बांधायला का आली नाही,” असे म्हणत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी शक्तिमान काळे याने दोन महिन्याच्या चिमुरडीचे तोंड आणि नाक दाबत असताना सोनम काळे या जाग्या झाल्या व त्यांनी पाहिले की आपला नवरा आपल्या दोन महिन्याच्या चिमुरडी हत्या करीत आहेत.

यावेळी त्या बाहेर आल्या व त्यांनी आरडाओरडा केली. यावेळी शेजारीच कोप्यात राहत असलेल्या कामगारांनी धाव घेतली. शेजाऱ्यांनी आरोपी शक्तीचा पाठलाग केला मात्र तो अंधाराचा फायदा घेऊन तेथून फरार झाला. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला स्वतःचा नवरा नाक तोंड दाबून हत्या करीत असतानाची दृश्य सोनमने पाहिल्याने तिची घडलेल्या प्रकाराबद्दल काही बोलण्याची मानसिकता नव्हती, त्यावेळी तिने फक्त मुलीच्या मयताची खबर दिली, मात्र काल इंदापूर पोलिस ठाण्यात याच आईने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. आपल्याच नवऱ्याने आपल्या दोन महिन्याच्या चिमुरडीची हत्या केली असल्याचे तिने पोलिसांनी सांगितलं.

घडलेल्या प्रकाराची तीव्रता लक्षात घेऊन यावेळी पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा नोंद करत, आरोपी सकटया उर्फ शक्तिमान काळे यास अटक केली. यासंदर्भात इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अधिक तपास करीत असून घडलेल्या घटनेबाबत इंदापूर तालुका आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Indapur father killed his 2 month old daughter)

हे ही वाचा

50 महिलांची छेड काढणारा गुन्ह्यानंतर घर का बदलत होता?

हुंडा न दिल्याने लग्न मोडलं, मुलगीही घरातून गायब; उद्विग्न बापाची गळफास घेऊन आत्महत्या

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.