गंभीर जखमी व्यक्तीची मदतीसाठी याचना, लोक मात्र व्हिडिओ बनवण्यात गुंग

जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला रस्त्यात काही लोक बेदम मारहाण करीत होते. यावेळी रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र त्याला वाचवण्याऐवजी गर्दीतील लोकं घटनेचा व्हिडिओ बनवण्यात मग्न होते.

गंभीर जखमी व्यक्तीची मदतीसाठी याचना, लोक मात्र व्हिडिओ बनवण्यात गुंग
कर्नाटकात माणुसकीला काळिमा फासणारी घटनाImage Credit source: social
Follow us
| Updated on: Nov 04, 2022 | 9:03 PM

म्हैसूर : कर्नाटकातील म्हैसूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला रस्त्यात काही लोक बेदम मारहाण करीत होते. यावेळी रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. मात्र त्याला वाचवण्याऐवजी गर्दीतील लोकं घटनेचा व्हिडिओ बनवण्यात मग्न होते आणि आरोपी त्याला मारहाण करत होते. माणुसकी आणि लोकांना मदत करण्याची भावना हरवत चालली आहे. व्यंकटेश असे पीडिते व्यक्तीचे नाव आहे.

भरदिवसा व्यक्तीवर हल्ला

हुन्सूर तालुक्यातील कडूकोपाला गावाजवळ ही घटना घडली आहे. भरदिवसा एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यावेळी तेथे उपस्थित लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी आपल्या मोबाईलमध्ये घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसले.

जमिनीच्या वादातून अज्ञातांकडून हल्ला

स्थानिक न्यायालयात जमिनीच्या वादाच्या सुनावणीला उपस्थित राहून व्यंकटेश घरी परतत होते. यादरम्यान काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. व्यंकटेशला एवढी बेदम मारहाण करण्यात आली की, यात त्यांना रक्तस्राव झाला आणि त्याचे संपूर्ण कपडे रक्ताने माखले होते.

हे सुद्धा वाचा

मात्र गर्दीतील कुणालाही पीडित व्यक्तीला मदत करावी वाटली नाही. यामुळे माणुसकी संपलीय का? प्रश्न मनात उपस्थित होतो.

यूपीमध्येही घडली अशीच घटना

अशीच एक घटना याआधी यूपीमध्ये घडली होती. यूपीतील कन्नौजमध्ये 25 ऑक्टोबर रोजी एक 12 वर्षाची मुलगी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. ही मुलगी लोकांकडे मदतीसाठी याचना करत होती. मात्र अडचणीत असलेल्या मुलीला मदत करण्याऐवजी लोक व्हिडिओ बनवण्यात गुंग होते.

काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मुलीला हॉस्पिटलमध्ये नेले. मुलीसोबत बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर हे प्रकरण खूप गाजले होते.

Non Stop LIVE Update
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.