Jalgaon Crime : लेक 4 महिन्यांची गर्भवती तरी नराधम बापाने गोळ्या घातल्या, जळगावच्या ‘सैराट’ची धक्कादायक माहिती समोर!
जळगावमधील चोपडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे लेकीने प्रेमविवाह केल्याचा राग मात धरून सीआरपीएफच्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या बापाने मुलीसह त्याच्या जावयावर केला गोळीबार केला आहे.

Jalgaon Chopda Owner Killing : जळगावमधील चोपडा येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे लेकीने प्रेमविवाह केल्याचा राग मात धरून सीआरपीएफच्या सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या बापाने मुलीसह त्याच्या जावयावर केला गोळीबार केला आहे. या गोळीबारात मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार चालू आहे.
मृत तृप्ती वाघ महिला चार महिन्यांची गर्भवती
एकीकडे सख्या मुलीचे लग्न असताना दुसरीकडे त्याच लग्नात सुनेची हत्या झाल्यामुळे तृप्तीच्या सासूसह सासरच्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. सर्वांत हादरवून टाकणारी बाब म्हणजे मृत तृप्ती वाघ ही महिला चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच पोटची मुलगी गर्भवती असूनही या माथेफिरू अर्जुन मागंले या बापाने तिला गोळ्या घातल्या आहेत. त्यामुळे एकाच वेळी चक्क दोन जीव गेले आहेत.
तृप्ती आणि तिच्या नवऱ्यावर गोळीबार
मयत तृप्ती वाग आणि तिचा पती अविनाश हे दोघे पुण्याहून नातेवाईकाच्या लग्नासाठी चोपडा शहरात आले होते. यावेळी हळदीचा कार्यक्रम चालू होता. हा कार्यक्रम चालू असतानाच तृप्तीचा बाप घटनास्थळी आला आणि त्याने अनानकपणे तृप्ती आणि तिच्या नवऱ्यावर गोळीबार केला. लहळदीच्या कार्यक्रमात तृप्ती आणि अविनाश हे दोघेही नाचत होते. चोपडा शहरातील आंबेडकर नगरमध्ये हा हळदीचा कार्यक्रम होत होता. ही घटना घडल्यानंतर ठरलेला विवाहसोहळा अत्यंत साधेपणाने पार पाडण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लग्नाचा आनंद होता, त्याच ठिकाणी आज शोकाकुल वातावरण पाहायला मिळालं.
आरोपी अर्जुन मांगले यास जबर मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार तृप्ती वाघ हिचा पती अविनाश याच्या पाठीत गोळी घुसली आहे. त्यामुळे अविनाश हा गंभीर जखमी आहे. अविनाश यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपी अर्जुन मांगले यास जबर मारहाण केली. यात मागले हा गंभईर जकमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार चालू आहेत. अर्जुन मांगले याच्याकडे परवाना असलेली बंदुक होती. याच बंदुकीतून त्याने तृप्ती आणि अविनाश यांच्यावर गोळीबार केला.
कठोर शिक्षा करण्याची मागणी
दरम्यान या घटनेचा पोलीस कसून तपास करत आहेत. एकीकडे लग्नाच्या घरातच गर्भवती असलेल्या मुलीचा खून झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. आरोपी अर्जुन मांगले याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता केली जात आहे.
