मासिक पाळीत स्वयंपाक केला म्हणून बेदम मारहाण, जीवच घेतला; जळगावमधील घटनेने महाराष्ट्र हादरला
1 मे रोजी गायत्रीने टोकाचं पाऊल उचलल्याचं समजताच तिच्या घरच्यांनी सासरी धाव घेतली. त्यांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मात्र गायत्रीची आत्महत्या नाही, ती जीव देऊच शकत नाही, ही हत्या आहे असा दावा माहेरच्यांनी केला.

जळगाव तालुक्यातील किनोद येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने गावात हळहळ व्यक्त होत होती. गायत्री ज्ञानेश्वर कोळी असे मयत 26 वर्षीय विवाहितेचे नाव आहे, तिने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. मात्र आता या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. मृत महिला गायत्रीने आत्महत्या केली नाही तर तिची सासू आणि नणंद यांनी तिच खून केला असा आरोप गायत्रीच्या आईने केला आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून सर्वत्र याचप्रकरणाची चर्चा सुरू आहे.
1 मे रोजी गायत्रीने टोकाचं पाऊल उचलल्याचं समजताच तिच्या घरच्यांनी सासरी धाव घेतली. त्यांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मात्र गायत्रीची आत्महत्या नाही, ती जीव देऊच शकत नाही. तिची सासू आणि नणंद यांनीच तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. मासिक पाळी आल्यावरही तिने स्वयंपाक तकेला, म्हणून सासू-नणंदेने मारहाण करून जीव घेतला असा भयानक, धक्कादायक आरोप करण्यात येत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मासिक पाळीमुळे गमावला जीव
मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री ज्ञानेश्वर कोळी 9वय 26) ही जळगाव तालुक्यातील किनोद येथे सासू, पती आणि मुलांसह रहायची. तिचे पती भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. तर गायत्री शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होती. मात्र 1 मे रोजी दुपारी 2च्या सुमारास तिने अचानक गळफास लावून आयुष्य संपवलं.
हे ऐकल्यावर तिच्या माहेरच्यांनी थेट घरी धाव घेतली. तिला रुग्णालयात नेण्यात आलं होतं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मात्र तिची ही आत्महत्या नाही तर घातपात आहे, तिची हत्या केली असा संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला.
“गायत्रीला मासिक पाळी आली होती. या काळात तिने स्वयंपाक केला होता, तो स्वयंपाक तिच्या सासू आणि इतरांना चालत नव्हता. यावरून किरकोळ वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्याने सासू आणि नणंद यांनी तिला मारझोड केली आणि गळा दाबून खून केला आणि नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवून दिले,” असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. सासरच्या दोषींवर गुन्हा होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पावित्र मयत गायत्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी घेतला होता. जळगावातील या भयाक प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
