जालना : जालन्या इनकम टॅक्स (Jalna News) विभागाने आठ दिवस सलग केलेली छापेमारी राज्याच चर्चेचा विषय ठरतेय. या छापेमारीच्या 10 मोठ्या आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेणार आहोत. अजय देवगनचा रेड (Raid Movie, Ajay Devgan) सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल, तर त्यात पैसे कुठे कसे लपवले जातात, बेनामी रोकड शोधून काढण्यासाठी काय शक्कल अधिकाऱ्यांना लढवावी लागते, हे पाहायला मिळालं होतं. आता जालन्यात जी रेड इनकम टॅक्सने (Jalna Income Tax) टाकली, तिच्यावर भविष्यात सिनेमा निघाला तर आश्चर्य वाटायला नको. कारण या छापेमारीत क्रिएटीव्हीटीही अधिकाऱ्यांना दाखवावी लागली. आठ दिवसांची ही छापेमारी सोपीही नव्हती. कोट्यवधींची रोकड शोधणं, मोठ्या प्रमाणात सोनं हाती लागलं, आणि जप्त करण्यात आलेली एकूण मालमत्ता पाहता, एकूणही ही किती मोठी कारवाई आयकर विभागाची होती, याची कल्पना करता येऊ शकेल. चला तर जाणून घेऊयात, याच छापेमारीच्या 10 मोठ्या गोष्टी…