महिलांनो दागिने सांभाळा, ऐन नवरात्रात सोनसाखळी चोर सुसाट

नवरात्र उत्सव काळात घडल्याने चोरटे सुसाट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली असून पोलीसांच्या कामगिरीवर नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.

महिलांनो दागिने सांभाळा, ऐन नवरात्रात सोनसाखळी चोर सुसाट
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 8:41 PM

नाशिक : नवरात्र उत्सवात नाशिकमधील (Nashik) चोरटे चांगलेच सुसाट असल्याचे दिसून येत आहे. शहरातील गुन्हेगारी (Crime) चांगलेच डोकं वर काढत असून भररस्त्यात नागरिकांची लूट होत असल्याने पोलीसांचा (Police) चोरट्यांना धाक राहीला नाही का ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे. इतकंच काय तर चोरट्यांनी जवळपास तेरा लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. भरदिवसा एका प्रवाशाच्या बॅगेतून रिक्षाने प्रवास करत असतांना अडीच लाख रुपये लंपास केले असून दुसऱ्या घटनेत भर दिवसाच घरफोडी करत साडेदहा लाखांचे दागिने लुटल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. या दोन्हीही घटना नवरात्र उत्सव काळात घडल्याने चोरटे सुसाट असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली असून पोलीसांच्या कामगिरीवर नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.

सातपुर भागातील ध्रुवनगर परिसरातील बालाजी पॅराडाइज या सोसायटीत राहणाऱ्या मीरा शशिकांत गंभीरे यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी केली आहे.

भरदुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास घरात प्रवेश करत घरातील कपाटात ठेवलेले दहा लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहे.

यामध्ये तीन मंगळसूत्र, एक अंगठी, एक चैन, चार बांगड्यासह कर्णफुले, नथ यांचा समावेश असून चोरांनी चोरी करून धूम ठोकली आहे.

यानंतर अशोकनगर येथील एका दाम्पत्याची सहप्रवाश्याने लूट केली आहे. नाशिकच्या त्र्यंबक नाका येथून अशोकनगरकडे जाणाऱ्या रिक्षात हा प्रकार घडला आहे.

रिक्षामध्ये चालकाबरोबरच आणखी दोन प्रवासी रिक्षातील मागील सीटवर बसले होते. त्यानंतर फिर्यादी विठ्ठल जिंगू पाटील आणि त्यांची पत्नी रिक्षात बसले होते.

यावेळी रिक्षाप्रवासात त्यांच्या बॅगेतील जवळपास २ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहे. यामध्ये सोन्याच्या बांगड्या, सोनसाखळी, ब्रेसलेटाचा समावेश आहे.

यामध्ये सातपुर पोलीसांनी अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.