भीषण! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसची ट्रकला समोरुन जोरदार धडक, 15 जण ठार

भीषण! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसची ट्रकला समोरुन जोरदार धडक, 15 जण ठार
झारखंडमध्ये भीषण अपघात

ज्या प्रवासी बसचा अपघात झाला, ती ब साहिबगंजहून दुमका इथं जात होती. आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह आहाती लागले आहेत. या अपघातात झालेली धडक इतकी जोरदार होती की काही प्रवासी तर थेट रस्त्यावर कोसळले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 05, 2022 | 1:08 PM

एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एका प्रवाशांनी भरलेल्या बसनं सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला समोरुन जोरदार धडक दिली. या अपघातात तबल्ल 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहे. या अपघाताची तीव्रता इतकी प्रचंड होती, की ट्रकसह बसच्या दर्शनी भागाचं मोठं नुकसान झालं आहे. तर बसची पुढील दोन्ही चाकंही अपघातात निखळली होती. या अपघातामुळे बराच वेळ वाहतूकही खोळंबल्याचं पाहायला मिळालंय.

कुठे झाला अपघात?

हा भीषण अपघात झाला आहे झारखंडमध्ये. झारखंडच्या अमरापाडा पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या कोला गावात ही भीषण दुर्घटना घडली. यात प्रवाशांनी भरलेल्या बस आणि गॅस सिलिंडरनं भरलेला ट्रक यांच्या समोरासमोर जोरदार टक्कर झाली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं ट्रक थेट बसला समोरुन ठोकर दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान झालं. तर बसमधील अनेक प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर झालेल्या मो्ठ्या आवाजानं स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांनाही अपघाताबाबत कळवण्यात आलं.

आतापर्यंत ट्रक आणि बसच्या या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृ्ताचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले असून काहींची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बचावकार्य करण्यास सुरुवात केली. अपघातातील जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर मृतदेह रस्त्यावर

ज्या प्रवासी बसचा अपघात झाला, ती ब साहिबगंजहून दुमका इथं जात होती. आतापर्यंत 15 जणांचे मृतदेह आहाती लागले आहेत. या अपघातात झालेली धडक इतकी जोरदार होती की काही प्रवासी तर थेट रस्त्यावर कोसळले. अपघातात जागीच मृत्यू झालेल्यांचे मृतदेहही रस्त्यावर आढळून आल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तर अनेक जखमी प्रवासी हे बसच्या आतमध्ये अडकून पडले होते.

इतर बातम्या –

Accident | काम सुरु असलेल्या ब्रिजला कारची धडक, चौघांचा मृत्यू, सोलापूर-विजापूर रोडवर भीषण अपघात

बुलडाण्यात सैराट! पळून जाऊन लग्न, पोलीस स्टेशनच्या बाहेरच तरुणाला संपवण्याचा प्रयत्न

‘…म्हणून मी बाईकवर नको ते चाळे केले’ रोडरोमियोची औरंगाबाद पोलिसांसमोर कबुली, म्हणाला…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें