AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan : मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, आरोपी शुक्लाने अखेर सोडलं मौन, मी स्वत:

ज्यांनी मारहाण सुरू केली, याप्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला यांना अद्याप अटक झालेली नाही. त्याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी अखिलेश शुक्ला यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे स्पष्टीकरण दिलं आहे.

Kalyan : मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण, आरोपी शुक्लाने अखेर सोडलं मौन, मी स्वत:
कल्याण मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लांचे स्पष्टीकरण
| Updated on: Dec 20, 2024 | 3:58 PM
Share

कल्याण पश्चिमेकडील योगीधाम एरिआमधील अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये झालेल्या मारहाणीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. या सोसायटीमध्ये एका मराठी कुटुंबाला अमराठी माणसाकडून मारहाण करण्यात आली. अखिलेश शुक्ला या इसमाने व त्याच्या कुटुंबाने त्याच इमारतीमध्ये राहणाऱ्या धीरज देशमुख यांना बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. मराठी माणसाला मुंबईत, महाराष्ट्रात काहीच किंमत नसल्याचा आरोप होत असून हे प्रकरण हिवाळी अधिवेशनातही गाजले. याप्रकरणी खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्तापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. सुमित जाधव आणि दर्शन बोराडे अशा दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

मात्र ज्यांनी मारहाण केली, याप्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला यांना अद्याप अटक झालेली नाही. त्याचदरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी अखिलेश शुक्ला यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांचे स्पष्टीकरण दिलं आहे. ‘ हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, मात्र त्याला आता भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे’ असा दावा शुक्ला यांनी केला आहे.

अखिलेश शुक्लांचे स्पष्टीकरण काय ?

अजमेरा इमारतीत झालेल्या वादावर अखिलेश शुक्ला यांनी बाजू मांडत याप्रकरणावर आपलं स्पष्टीकरण दिले आहे. हा वाद शेजारधर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. आपल्या पत्नीवर आधी हल्ला करण्यात आला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी त्यांना वाचवले,असे त्यांनी सांगितलं.

“आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो.  या वादाचे व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत, पण त्या वादादरम्यान देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला. माझ्या बायकोला शिवीगाळ केली, तिचे केस पडकून तिला मारहाण करण्यात आली ” असा आरोपही शुक्ला यांनी पुढे केला . खरंतर हा शेजारीपणाचा जुना वाद असून त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत शुक्ला यांनी त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. या घटनेचा सखोल तपास करून सत्य बाहेर यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?