Kalyan Crime : चक्क शिवाजी महाराजांचा दुर्गाडी किल्लाच नावावर करण्याचा प्रयत्न; कल्याणमधील धक्कादायक प्रकार

दस्तावेज तपासणीदरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटर व स्वाक्षरी केलेल्या दस्तावेज आढळून आल्याने हे प्रकरण उघडकीस आलं.

Kalyan Crime : चक्क शिवाजी महाराजांचा दुर्गाडी किल्लाच नावावर करण्याचा प्रयत्न; कल्याणमधील धक्कादायक प्रकार
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 3:21 PM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 3 नोव्हेंबर 2023 : कल्याण शहरातील मानाची वास्तू असलेल्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे महत्वाचे सर्वांनाच माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याशी जवळचा संबंध असलेल्या कल्याण शहरात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आढळतात. दुर्गाडी किल्ला हा त्यापैकीच एक. कल्याणच्या खाडी किनारी उभा असलेला हा किल्ला शहराचा इतिहास सांगण्यासाठी भक्कम उभा आहे.

मात्र याच कल्याण शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  शिवरायांच्या काळातील या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचे बनावट पेपर करून ती जागा नावावर करण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी बनावट पेपर तयार करून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकेड निवेदन देण्यात आले होते. दस्तावेज तपासणीदरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटर व स्वाक्षरी केलेल्या दस्तावेज आढळून आल्याने अखेर हे प्रकरण उघडकीस आलं.

तहसीलदार कार्यालयातील प्रीती घोडे यांनी याप्रकरणी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्या आला आहे. सुयश शिर्के हा माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचे अध्यक्ष असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

Non Stop LIVE Update
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.