मध्य प्रदेशातील कुख्यात चेन स्नॅचर महाराष्ट्र पोलिसांच्या जाळ्यात, कल्याणच्या खडकपाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

खडकपाडा पोलिसांनी आज धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली आहे. मध्य प्रदेशमधील कुख्यात चैन स्नॅचरला खडकपाडा पोलिसांनी आंबिवली येथून बेड्या ठोकल्या आहेत (Kalyan Khadakpada police arrest chain snatcher).

  • अमजद खान, टीव्ही 9 मराठी, कल्याण
  • Published On - 23:01 PM, 7 Apr 2021
मध्य प्रदेशातील कुख्यात चेन स्नॅचर महाराष्ट्र पोलिसांच्या जाळ्यात, कल्याणच्या खडकपाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी
मध्य प्रदेशाचा कुख्यात चेन स्नॅचर महाराष्ट्र पोलिसांच्या जाळ्यात, कल्याणच्या खडकपाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

कल्याण (ठाणे) : खडकपाडा पोलिसांनी आज धडाकेबाज कामगिरी करुन दाखवली आहे. मध्य प्रदेशमधील कुख्यात चैन स्नॅचरला खडकपाडा पोलिसांनी आंबिवली येथून बेड्या ठोकल्या आहेत. कल्याण शहराजवळील आंबिवली येथे इराणी वस्ती आहे. या इराणी वस्तीत देशभरात स्नॅचिंग करणारे अनेक आरोपी लपून राहतात. अनेकदा या वस्तीमधून गंभीर गुन्ह्यातील आरोपी पकडले गेले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर वारंवार हल्लेसुद्धा झालेले आहे. काही दिवसांपूर्वी वसई क्राईम ब्राँचच्या पोलिसांवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले होते. तर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीला पळवून नेण्यात हल्लेखोर यशस्वी झाले होते (Kalyan Khadakpada police arrest chain snatcher).

पोलिसांनी तपास कसा केला?

इतके सगळे घडले असताना पोलिसांना माहिती मिळाली की, भोपाळमध्ये कोतवाली पोलीस ठाण्यात एक चैन स्नॅचिंगचा गुन्हा घडला आहे. त्या आारोपीच्या शोधात पोलीस आहेत. त्याच्यावर दहा हजार रुपयांचे बक्षीस लावण्यात आले आहे. जाफर उर्फ चौहान यूसूफ जाफरी नावाच्या या आरोपीला पकडण्यासाठी खडकपाडा पोलीस गेल्या सहा महिन्यापासून प्रयत्न करीत होते (Kalyan Khadakpada police arrest chain snatcher.)

अखेर खडकपाड्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांच्या शोध पथकास या कामात यश आले. जाफर याला अटक करण्यात आली. जाफर विरोधाता कल्याणच्या पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. जाफरचा ताबा घेण्यासाठी बुधावारी (7 एप्रिल) भोपाळ पोलीस कल्याणला आले असता कल्याणचे एसीपी अनिल पवार यांच्या उपस्थितीत आरोपीला भोपाळ पोलिसांच्या ताबा देण्यात आले.

कल्याणमध्ये एमडी ड्रग्ससह तिघांना अटक

दुसरीकडे कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी एमडी ड्रग्स विकणाऱ्या तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. पोलिसांनी आरोपींकडून 54 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले आहे. मेंहदी मजीद, इस्माईल घाडीवाल, सेहवाज शेख अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघे एमडी ड्रग्स कोणाला विकण्यासाठी आले होते, याचा तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.