पोलिसाच्या मारहाणीत पतीचा मृत्यू, पत्नीचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ, यूपी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्हं

गोरखपूर: कानपूरचे व्यापारी मनीष गुप्ता यांचा गोरखपूरमधील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी केलेल्या कथितरीत्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत त्यांची पत्नी मीनाक्षी गुप्ता यांचा एक हृदयला पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मिनाक्षी पोलिसांवरच मारहाणीचा आरोप करत आहे. मीनाक्षी गुप्ता हात जोडून रडत आहे आणि आपल्या पतीसाठी न्यायाची विनवणी करत आहे. हेच नाही […]

पोलिसाच्या मारहाणीत पतीचा मृत्यू, पत्नीचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ, यूपी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्हं
पत्नी मीनाक्षी गुप्ता यांचा एक हृदयला पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मिनाक्षी पोलिसांवरच मारहाणीचा आरोप करत आहे.
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 2:21 PM

गोरखपूर: कानपूरचे व्यापारी मनीष गुप्ता यांचा गोरखपूरमधील एका हॉटेलमध्ये पोलिसांनी केलेल्या कथितरीत्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत त्यांची पत्नी मीनाक्षी गुप्ता यांचा एक हृदयला पिळवटून टाकणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मिनाक्षी पोलिसांवरच मारहाणीचा आरोप करत आहे. मीनाक्षी गुप्ता हात जोडून रडत आहे आणि आपल्या पतीसाठी न्यायाची विनवणी करत आहे. हेच नाही तर पोलीस केस मागं घेण्यासाठी दबाव बनवत असल्याचाही आरोप मीनाक्षी यांनी केला आहे. ( kanpur-businessmans-wife-meenakshi-gupta-heart-wrenching-appeal-for-justice-goes-viral gorakhapur yogi aadityanath UP police )

मीनाक्षी गुप्ताच्या हृदयस्पर्शी आवाहनाचा हा व्हिडिओ ट्विटरवर enBenarasiyaa नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 30 सेकंदांच्या या क्लिपमध्ये मीनाक्षी हात जोडून रडताना दिसत आहे. त्याचवेळी काही लोक आणि पोलीस मागे उभे आहेत. या दरम्यान मीनाक्षी रडत म्हणते, मी हात जोडून विनंती करते ही माझ्या पतीची या हॉटेलमध्ये हत्या झाली आणि एका पोलिसवाल्याने हे कृत्य केलं आहे.

मीनाक्षी पुढे म्हणतात की, मला न्याय मिळवा. त्या म्हणतात की, पोलिसांच्या व्हिडीओत कुठंही रक्त दिसत नाही, पण त्यांच्या मित्रांनी सांगितलं की, मनीष हे रक्ताने माखलेले होते, पण पोलिसांच्या सांगण्यावरुन हॉटेलवाल्यांनी सगळं रक्त साफ केलं. कृपा करुन मला मदत करा. माझ्या पतीला न्याय द्या.

कानपूरचे प्रॉपर्टी डीलर मनीष गुप्ता गोरखपूरच्या कृष्णा पॅलेस हॉटेलमध्ये आपल्या दोन मित्रांसोबत राहत होते. आरोप आहे की, 6 पोलिस त्याच्या खोलीत आले आणि ओळखपत्र दाखवण्यास सांगितले, यानंतर त्यांनी तिघांना मारहाण केली आणि त्यानंतर मनीषच्या मित्रांना खाली आणले. काही वेळानंतर जेव्हा पोलीस मनीषला खाली आणलं, तेव्हा त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्तस्त्राव होत होता. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ:

विशेष म्हणजे हा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाच मतदारसंघ आहे. याआधीही बऱ्याचदा गोरखपूर पोलिसांच्या अशा दादागिरीची प्रकरणं बाहेर आली होती, पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. हेच नाही तर या प्रकरणाने पुन्हा एकदा यूपी पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. मिनाक्षी यांचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, आता किमान या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होणं गरजेचं आहे, तरच यूपी पोलिसांवर जनतेचा भरोसा राहिल.

हेही पाहा:

आरे कॉलनीत 64 वर्षांच्या आजीवर बिबट्याचा हल्ला, आजीने काठीने बिबट्याचं तोंड फोडलं, व्हिडीओ व्हायरल

पुन्हा एकदा चर्चेत आली रानू मंडल, तिच्याच शैलीत गायलं ‘Manike Mage Hithe’ गाणं – पाहा व्हिडीओ

 

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.