बापाकडून वारंवार लैंगिक छळ, 17 वर्षीय मुलीने बॉयफ्रेण्डच्या मदतीने जन्मदात्याला संपवलं

चार आरोपी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास घरी आले. दरवाजा ठोठावला. मोठ्या मुलीने दरवाजा उघडला. त्यानंतर आरोपींनी घरात शिरुन 46 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले

बापाकडून वारंवार लैंगिक छळ, 17 वर्षीय मुलीने बॉयफ्रेण्डच्या मदतीने जन्मदात्याला संपवलं
crime News


बंगळुरु : 17 वर्षीय मुलीने आपल्या वडिलांना जीवे मारण्यासाठी प्रियकर आणि त्याच्या तीन मित्रांकडून मदत मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सख्ख्या वडिलांवर तिने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. मूळ बिहारचा रहिवासी असलेला 46 वर्षीय मयत पिता कर्नाटकातील अत्तूर लेआउट भागात राहत होता. कलबुर्गी येथील महिलेशी त्याचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुली होत्या, 11 वर्षांची धाकटी मुलगी शाळेत शिकते, तर 17 वर्षीय मोठी मुलगी कॉलेजची विद्यार्थिनी आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी मुलीची आई त्या रात्री माहेरी कलबुर्गीला गेली होती. यावेळी पिता अरुण (नाव बदलले आहे) आणि त्याच्या दोन मुली घरात होत्या. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चार आरोपी अरुणच्या घरी मध्यरात्री 12:30 वाजता आले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. मोठ्या मुलीने दरवाजा उघडला. आरोपींनी घरात शिरुन अरुणवर हल्ला केला. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. पहाटे 1:30 च्या सुमारास धाकट्या बहिणीने आरडाओरड करुन इमारतीतील रहिवाशांना जागे केले आणि वडिलांवर अज्ञात लोकांनी हल्ला केल्याचे सांगितले.

हातोड्याने वार करुन वडिलांची हत्या

येलहंका न्यू टाऊन पोलिस घटनास्थळी आले, तेव्हा त्यांना अरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांनी सांगितले की, त्याच्यावर अनेक वेळा हातोड्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. कसून चौकशी केल्यानंतर आपल्या मित्रांनीच वडिलांची हत्या केल्याची कबुली मुलीने पोलिसांकडे दिली. वडिलांनी आपले लैंगिक शोषण केल्याचेही तिने सांगितले. आरोपी मुलीच्या आईनेही तिच्या दाव्याचे समर्थन केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाचही आरोपी अल्पवयीन

पोलिसांनी चार हल्लेखोरांकडून खुनासाठी वापरलेली शस्त्रे जप्त केली आहेत आणि मुलीने तिच्या वडिलांवर केलेल्या आरोपांचाही तपास करत आहेत. चारही आरोपी आणि मुलगी अल्पवयीन असून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्यांना बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

काम करत नाही म्हणून वेटरला हॉटेलमालकाची बेदम मारहाण, पुरावा लपवण्यासाठी केलं मृतदेह दरीत फेकला!

शक्तीमिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द, तिघांनाही जन्मठेप

प्रेमविवाहाला विरोध, मामाच्या 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण, नवी मुंबईत भाची-जावई जेरबंद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI