Breaking News: मुंबईत गाजलेल्या शक्तीमिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द, आता तिघांनाही हायकोर्टाकडून जन्मठेप

मुंबई सत्र न्यायालयाने याआधी 2014 मध्ये यातील तिनही आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. आज त्यावर अंतिम सुनावणी करत मुंबई हायकोर्टाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Breaking News: मुंबईत गाजलेल्या शक्तीमिल बलात्कार प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द, आता तिघांनाही हायकोर्टाकडून जन्मठेप
शक्ती मिल सामुहिक बलात्कार प्रकरणी तीन आरोपींची फाशी रद्द, मुंबई हायकोर्टाचा निकाल
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 25, 2021 | 11:55 AM

मुंबईः बहुचर्चित शक्ती मिल सामूहिक (Shakti mill) बलात्कार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) आज अंतिम निकाल जाहीर केला असून या प्रकरणातील तिनही दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ऑगस्ट 2013 मध्ये मुंबईतील शक्ती मिल परिसरात महिला फोटोग्राफरवर सामुहिक बलात्कार झाला होता. मुंबई सत्र न्यायालयाने याआधी 2014 मध्ये यातील तिनही आरोपींना दोषी ठरवत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. आरोपींनी या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. आज त्यावर अंतिम सुनावणी करत मुंबई हायकोर्टाने आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

तिघांची फाशी टळली, जन्मठेपेची शिक्षा

शक्तीमिल बलात्कार प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. यात विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यातील सिराज खानला मुंबई सत्र न्यायालयाने आधीच जन्मठेप दिली होती. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठण्यात आले होते. तर उर्वरीत विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासिम बंगाली यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. या तिघांनाही आज हायकोर्टाने फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

महालक्ष्मीत 22 ऑगस्ट 2013 रोजी बलात्कार

22 ऑगस्ट 2013 रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामुहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला आप्लया सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तेथे गेली होती. त्यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे अन्य एका 19 वर्षीय तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणातील आरोपीदेखील तेच होते. मुंबई सत्र न्यायालयाने यातील आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला शिक्षा सुनावली होती. सिराज खानला जन्मठेप तर इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

इतर बातम्या-

नगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या, धक्क्यातून अल्पवयीन प्रियकराचाही शेतात गळफास

पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, दुष्कृत्य केल्यानंतर चालत्या कारमधून फेकले

आधी आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, वेदनेने रडत होती म्हणून गळा दाबला, वाचा नेमकं काय घडले?</p>

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें