नगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या, धक्क्यातून अल्पवयीन प्रियकराचाही शेतात गळफास

अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनंतर काही तासातच प्रियकराने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी अल्पवयीन मुलगी आणि मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या, धक्क्यातून अल्पवयीन प्रियकराचाही शेतात गळफास
crime


अहमदनगर : अल्पवयीन प्रेयसीच्या आत्महत्येनंतर तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास लावून घेतल्याचं समजल्यानंतर अल्पवयीन मुलानेही शेतात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. अहमदनगरमध्ये एकाच दिवशी घडलेल्या आत्महत्यांच्या दोन घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आपटी येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनंतर काही तासातच प्रियकराने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी अल्पवयीन मुलगी आणि मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

नेमकं काय घडलं?

आत्महत्या करणाऱ्या मुलाचं वय 17 वर्ष, तर मुलीचं वय 16 वर्ष आहे. दोघांचे एकमेकाशी प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. अल्पवयीन मुलीने आधी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातच राहणाऱ्या तिच्या प्रियकरालाही ही दुःखद बातमी समजली, त्यानंतर आपल्या प्रेयसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो प्रियकर मुलीच्या घरी गेला.

प्रियकराचा शेतातील झाडाला गळफास

त्यावेळी आपल्या प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचे त्याले समजले. प्रेयसीच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्यातून सावरण्याआधीच त्याने मोठा निर्णय घेतला. अल्पवयीन मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत असून दोघांनीही नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

संबंधित बातम्या :

पोलीस भरतीची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार, दुष्कृत्य केल्यानंतर चालत्या कारमधून फेकले

आधी आठ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार, वेदनेने रडत होती म्हणून गळा दाबला, वाचा नेमकं काय घडले?

Pune Crime | जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या दरोडा ; गोळीबारात व्यवस्थापकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI