AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे 5 कोटींची खंडणी, कोल्हापुरात एकाला अटक

कोल्हापुरातील उद्योगपती संजय घोडावत यांना व्हॉट्सअॅप कॉल करुन आरोपींनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. खंडणी न दिल्यास त्यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांच्याकडे 5 कोटींची खंडणी, कोल्हापुरात एकाला अटक
Sanjay Ghodawat
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 7:35 AM
Share

कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत (Sanjay Ghodawat) यांच्याकडून पाच कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. खंडणी न दिल्यास संजय घोडावत यांच्यासह कुटुंबीयांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हातकणंगलेतून आरोपीला अटक केली आहे. (Kolhapur Extortion of 5 crore from famous Businessman Sanjay Ghodawat)

नेमकं काय घडलं?

56 वर्षीय उद्योजक संजय घोडावत कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील जयसिंगपूरमध्ये राहतात. 13 ते 18 जून या कालावधीत त्यांना व्हॉट्सअॅप मेसेज, एसएमएस आणि व्हॉट्सअॅप कॉल करुन आरोपींनी पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. खंडणी न दिल्यास त्यांच्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.

घोडावतांच्या भागिदारालाही धमकी

संजय घोडावत यांच्यासह त्यांचे भागीदार निलेश बागी (रा. बेळगाव) यांनाही अशाच प्रकारची धमकी आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर घोडावत यांनी हातकणंगले पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला.

हातकणंगलेतून एकाला अटक, दिल्लीचा आरोपी पसार

खंडणी मागणाऱ्या रमेशकुमार प्रजापती ठक्कर या आरोपीला हातकणंगले पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दिल्लीचा रहिवासी असलेला ठक्करचा साथीदार व्ही पी सिंग पसार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. आरोपीकडून एक लाख रुपयांची रोकड, 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि एक्स्क्लुझिव्ह डायरी असं लिहिलेली वही पोलिसांनी जप्त केली आहे. घोडावत यांच्याकडून खंडणी वसुलीचा प्रयत्न झाल्याने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपुरात डॉक्टर दाम्पत्याकडे खंडणी

दरम्यान, नागपूरमध्ये डॉक्टर दाम्पत्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणी फॅशन डिझायनर महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. वेब सीरिज पाहून तरुणीने डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती.

संबंधित बातम्या :

एक्सप्रेस आंबिवली रेल्वे स्टेशनवर थांबली, अभिनेत्री फोनवर बोलत दरवाज्यावर आली, चोरट्याने संधी साधली

डॉक्टर दाम्पत्याच्या मुलांच्या अपहरणाचा कट, नागपुरात फॅशन डिझायनर महिलेला अटक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.