कोल्हापूर : कोल्हापुरात (Kolhapur news) एका कुटुंबावर अज्ञात टोळक्यांनी हल्ला केला. या कुटुंबाला घराच्या एका खोलीमध्ये डांबलं आणि त्यानंतर घरच पेटवून देण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या शिंगणापूरमध्ये (Kolhapur Shinganapur) घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. या धक्कादायक आणि दहशत माजवणाऱ्या प्रकारामुळे कोल्हापुरातील शिंगणापुरात घबराट पसरली आहे या घटनेमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसारोपयोगी सामानाची राख झाली आहे. याप्रकरणी आता अज्ञात टोळक्यांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान कोल्हापूर पोलिसांसमोर (Kolhapur Police) आहे. आगीमध्ये कुटुंबाचं आर्थिक नुकसान झालं होतं, घराचीही वाताहत झाली आहे. याप्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल करुन घेण्यात आलीय. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असावी, अशी शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. सध्या याप्रकरणी पुढील तपास केला जातोय.