पाच चोर पकडले, 10 गुन्हे उघड झाले, 32 मोबाईल, कारसह लाखोंचं घबाड सापडलं

संशयित आरोपींकडून विविध ठिकाणचे 10 गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती आहे. चोरीच्या गुन्ह्यातील 6 मोटारसायकल, 1 अल्टो कार, 2 लॅपटॉप, विविध कंपनीचे 32 मोबाईल फोन असा सुमारे 6 लाख 68 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पाच चोर पकडले, 10 गुन्हे उघड झाले, 32 मोबाईल, कारसह लाखोंचं घबाड सापडलं
वाशीमध्ये पुजाऱ्याकडूनच जैन मंदिरात 10 लाखाची चोरी, वाशी येथील धक्कादायक घटना

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतलेल्या पाच संशयित आरोपींकडून विविध ठिकाणचे चोरीचे 10 गुन्हे उघडकीस आणले. तसेच आरोपींकडून सुमारे 6 लाख 68 हजार किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.

नेमकं काय घडलं?

इचलकरंजी शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने चोरीच्या घटनांचा तपास करुन चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. याच दरम्यान गुन्हे शोध पथकाने विविध चोरीच्या गुन्ह्यात पोलिस रेकॉर्डवरील रामा अशोक कोरवी, नागेश शिंदे, आसीफ चिकोडे, योगेश कांबळे, अजय पाटील या पाच जणांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता जयसिंगपूर, हातकणंगले, शहापूर, गांवभाग आणि शिवाजीनगर अशा विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली.

6 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

या कबुलीतून संशयित आरोपींकडून विविध ठिकाणचे 10 गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली. तसेच चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या पोलिस रेकॉर्डवरील रामा अशोक कोरवी, नागेश शिंदे, आसीफ चिकोडे, योगेश कांबळे, अजय पाटील या संशयित आरोपींकडून विविध ठिकाणच्या चोरीच्या गुन्ह्यातील 6 मोटारसायकल, 1 अल्टो कार, 2 लॅपटॉप, विविध कंपनीचे 32 मोबाईल फोन असा सुमारे 6 लाख 68 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्याच्या तपासकामी जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपाधीक्षक बी. बी. महामुनी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच ही कारवाई गुन्हे शोध पथकातील पोलिस कॉन्स्टेबल सागर चौगले, गजानन बरगाले, प्रविण कांबळे, सुनील बाईत, आशुतोष शिंदे, अमित कांबळे, सतीश कुंभार, विजय माळवदे यांनी केल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी सांगितले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मगर, पोलिस उपनिरीक्षक भागवत मुळीक यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

जगावेगळी चोरी! तलावातून चोरले तब्बल 5 लाखांचे मासे, चौघांविरोधात तक्रार, पोलीसही चक्रावले

बस स्थानकातून ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसह चोरीला, सीसीटीव्हीमुळे चोरटा जेरबंद

(Kolhapur Ichalkaranji theft 5 thieves arrested for 10 cases)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI