लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जोडीदाराशी वाजलं, तिने थेट गळफासच….निर्भया पथक मदतीला धावलं
आजकाल बरेच जण हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. प्रेम आहे पण लग्न करायचं नाहीये, तर लिव्ह इनचा पर्याय अनेक लोक निवडतात. मात्र अशावेळी वाद झाला तर काही लोक रागाच्या भरात टोकाचा निर्णयही घेतात
आजकाल बरेच जण हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतात. प्रेम आहे पण लग्न करायचं नाहीये, तर लिव्ह इनचा पर्याय अनेक लोक निवडतात. मात्र अशावेळी वाद झाला तर काही लोक रागाच्या भरात टोकाचा निर्णयही घेतात. अशीच घटना कुर्ला येथे घडली. लिव्ह इनमध्ये राहताना जोडीदारासोबत वाद झाल्याने एक महिलेने स्वत:चं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या निर्भया पथfigकाच्या प्रसंगावधनातेमुळे तिचा जीव वाचला. पोलिसांनी त्तकाळ धाव घेऊन त्या महिलेला समजवात तिचा जीव वाचवला. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील नेहरू नगरध्ये गुरूवारी दुपारी ही घटना घडली, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचा जीव वाचला. ही महिला 35 वर्षांची असून काही काळापासून ती कुर्ला येथीन म्हाडाच्या इमारतीतील फ्लॅटमध्ये जोडीदारासोबत लिव्ह इनमध्ये राहते. मात्र गुरूवारी त्या दोघांचं कोणत्या तरी कारणावरून भांडण झालं. त्यानंतर संतापाच्या भरात महिलेने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. भांडणानंतर ती तत्काळ आत गेली आणि त्या खोलीत जाऊन तिने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
ते पाहून तिच्या मित्राने तत्काळ नेहरू नगर पोलिसांन फोन करत घटनेची माहिती दिली आणि मदत मागितली. नेहरू नगर पोलिसांचे निर्भया पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या महिलेला कसेबसे रोखले. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून तिचे समुपदेशन करण्यात आले.निर्भया पथकाने दाखवलेल्या तत्परतेमुळे या महिलेचे प्राण वाचले.