जे हात कामाच्या शोधात होते ते दगडापर्यंत पोहोचले पण रिक्षा चालकाला ठेचण्यासाठी? नागपुरात नेमकी हत्या का?

ऑटो रिक्षाच्या भाड्यावरून वाद झाला आणि मध्य प्रदेशच्या पती-पत्नीने नागपुरातील ऑटो रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे (Madhya Pradesh couple killed auto rickshaw driver in nagpur).

जे हात कामाच्या शोधात होते ते दगडापर्यंत पोहोचले पण रिक्षा चालकाला ठेचण्यासाठी? नागपुरात नेमकी हत्या का?
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 6:56 PM

नागपूर : ऑटो रिक्षाच्या भाड्यावरून वाद झाला आणि मध्य प्रदेशच्या पती-पत्नीने नागपुरातील ऑटो रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हुडकेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील आऊटर रिंगरोड परिसरात ही हत्या करण्यात आली. मृतक रिक्षा चालक हे नागपूरचे रहिवासी होते. तर हल्ला करणारं दाम्पत्य हे मध्य प्रदेशचे असल्याचं समोर आलं आहे (Madhya Pradesh couple killed auto rickshaw driver in nagpur).

नेमकं काय घडलं?

मध्य प्रदेशमधील पती-पत्नी नागपुरात कामाच्या शोधात आलं होतं. त्यांना खरबी चौकातून आऊटर रिंगरोड परिसरात असलेल्या एका टाईल्सच्या कंपनीत काम मिळालं होतं. तिथे त्यांना जायचं होतं. त्यासाठी त्यांनी खरबी चौकातून ऑटो रिक्षा केला आणि ते तिकडे निघाले. नियोजित स्थळी पोहचल्यानंतर ऑटो रिक्षा चालकाने आपलं भाडं मागितलं.

भाडं जास्त असल्याच्या वादातून हाणामारी

रिक्षा चालकाने भाडं जास्त असल्याचं त्या दाम्पत्याला वाटलं. त्यावरून ऑटो चालक अनिल बर्बे आणि त्या दाम्पत्यामध्ये वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी दाम्पत्याने रिक्षा चालकाची दगडाने ठेचून हत्या केली (Madhya Pradesh couple killed auto rickshaw driver in nagpur).

पोलिसांकडून अटक

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी पती राम लखन आणि त्याची पत्नी अनिता या दोघांना अटक केली. दोघे पतीपत्नी मध्यप्रदेशच्या सागर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

अगदी शुल्लक कारणावरून ही हत्या झाली. मात्र कामाच्या शोधत आलेलं हे दाम्पत्य आता काम सोडून जेलमध्ये जाणार आहे. या घटनेतून माणसाची खरंच सहनशक्ती कमी होतेय का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

हेही वाचा : Tamilnadu Election 2021 : कमल हसन यांनी भाजप-काँग्रेसविरोधात दंड थोपटले, या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....