तरुणाशी बोलल्याचा राग, भररस्त्यात दोघींना कुटुंबीयांचीच लाठ्या-दांडक्यांनी मारहाण

धक्कादायक म्हणजे दोघींना मारहाण करणाऱ्यांमध्ये तिचे चुलत भाऊ आणि कुटुंबीयांचा समावेश आहे. तरुणांशी बोलल्याच्या रागातून दोघींना भरचौकात मारहाण झाल्याचा आरोप आहे.

तरुणाशी बोलल्याचा राग, भररस्त्यात दोघींना कुटुंबीयांचीच लाठ्या-दांडक्यांनी मारहाण
मध्य प्रदेशात तरुणींना मारहाण, व्हिडीओ व्हायरल

भोपाळ : मध्य प्रदेशातील अलीराजपूरमध्ये तरुणींसोबत झालेल्या गैरवर्तनाचे प्रकरण शांत होत नाही, तोच धार जिल्ह्यातील पीपलवा गावातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जमावाने दोन तरुणींना लाकडी लाठ्या-दांडक्यांनी मारहाण केल्याचं  दिसत आहे. दोघींसोबत अक्षरशः जनावरांप्रमाणे वर्तन केल्याचं दिसत आहे. (Madhya Pradesh Peepalwa Two Girls beaten up by family video viral)

कुटुंबातील सदस्यांकडूनच मारहाण

धक्कादायक म्हणजे दोघींना मारहाण करणाऱ्यांमध्ये तिचे चुलत भाऊ आणि कुटुंबीयांचा समावेश आहे. तरुणांशी बोलल्याच्या रागातून दोघींना भरचौकात मारहाण झाल्याचा आरोप आहे. फक्त तरुणच नाही, तर कुटुंबातील महिलांनीही दगड आणि लाथाबुक्क्यांनी दोघींना मारहाण केली.

बघ्यांकडून व्हिडीओ शूटिंग

हा भयानक प्रकार सुरु असताना अनेक जणांनी केवळ बघ्याची भूमिका घेत मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करण्यात धन्यता मानली. कोणीही युवतींच्या मदतीसाठी पुढे आलं नाही, याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. लाकडी लाठ्या-दांडक्यांनी मारहाण होत असताना दोघी युवती आरडाओरड करत होत्या, मात्र कोणाच्याही मनाला पाझर फुटला नाही.

कुटुंबातील सात जणांना अटक

घाबरलेल्या युवतींना पोलिसात तक्रार करण्याचाही धीर होत नव्हता. अखेर टांडा पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय वास्कले यांनी व्हिडीओ पाहून तरुणींना चौकशीसाठी बोलावलं. त्यानंतर तक्रार दाखल करुन कुटुंबातील सात जणांना अटक करण्यात आली आहे.

कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी परिसरात नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. रिक्षाचालकाने तरुणीची छेड काढल्यामुळे तिने मदतीसाठी बोलवलेल्या दोघांनाच जमावाने मारहाण केली. तरुणीसह दोघा तरुणांना जमाव बेदम मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला होता. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. सध्या या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे

संबंधित बातम्या :

VIDEO | कल्याणमध्ये रिक्षाचालकाकडून तरुणीची छेडछाड, मदतीसाठी पोहोचलेल्या दोघांना जमावाची मारहाण

(Madhya Pradesh Peepalwa Two Girls beaten up by family video viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI