AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

18 वर्षाने लहान असलेल्या मुलासोबत 2 मुलांच्या आईला करायचं होतं लग्न, पण…

पदरात दोन मुलं असलेल्या एका महिलेचा अल्पवयीन मुलावर जीव जडला. ती त्याच्या प्रेमात इतकी बुडाली की, तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. महिलेने या मुलाच लैंगिक शोषण केलं. या महिलेला त्या मुलाशी लग्न करायचं होतं.

18 वर्षाने लहान असलेल्या मुलासोबत 2 मुलांच्या आईला करायचं होतं लग्न, पण...
Love Affair
| Updated on: Jun 12, 2025 | 10:25 AM
Share

प्रेमाला तुम्ही बांधू शकत नाही. ते कधीही, कुठेही, कोणावरही जडू शकतं. पण प्रेमाच्या बाबतीत भान बाळगणं आवश्यक असतं. हे भान सुटलं, तर अनर्थ व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे प्रेम कधीही, कुठेही, कोणावरही होऊ शकतं, हे जरी खरं असलं, तरी त्यावर नियंत्रण ठेवणं सुद्धा तितकच आवश्यक आहे. प्रेमात चेहरा किंवा वय पाहिलं जात नाही. पण काही लोक प्रेमात इतके वेडे होऊन जातात की, समोरचा माणूस त्यांना कंटाळतो. असच एक प्रकरण मध्य प्रदेशच्या रतलाममधून समोर आलय. इथे दोन मुलांच्या घटस्फोटीत आईचा एका अल्पवयीन मुलावर जीव जडला. ती त्याच्यावर एकतर्फी प्रेम करु लागली. हा अल्पवयीन मुलगा त्या महिलेच्या नजरेत भरला. ती एक वर्ष त्या मुलाच्या मागे लागलेली. त्याला खूप सतवलं. अखेर या मुलाने कंटाळून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

हाटच्या चौकी ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. आरोपी महिला घटस्फोटीत आहे. तिला एक 14 वर्षांची मुलगी आणि 9 वर्षांचा मुलगा आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने 17 वर्षाच्या मुलाला एक वर्ष टॉर्चर केलं. तिने फक्त या मुलाच लैंगिक शोषणच केलं नाही, तर लग्नासाठी अल्पवयीन मुलावर दबाव टाकत होती. लग्न केलं नाहीस, तर खोट्या प्रकरणात अडकवीन अशी धमकी ही महिला त्या मुलाला देत होती.

‘वर्षभरापासून माझ्या मुलाच शोषण’

हाटचे चौकी प्रभारी मुकेश सस्तिया यांनी सांगितलं की, पीडित मुलगा आपल्या वडिलांसह पोलीस ठाण्यात आला होता. वडिलांनी सांगितलं की, “माझा मुलगा दहावीत आहे. एक घटस्फोटित महिला वर्षभरापासून माझ्या मुलाच शोषण करत आहे” “तक्रारीचा हवाला देऊन महिलेने याआधी दोनदा अशाच प्रकारे लग्न केलं आहे” असं मुलाच्या वडिलांनी सांगितलं. पीडित मुलाच्या वडिलांनुसार, “मागच्या वर्षभरापासून महिला त्यांच्या मुलाला वारंवार आपल्या घरी बोलवून धमकावयची. लग्नासाठी त्याच्यावर दबाव टाकत होती”

महिलेला झाली अटक

पोलिसांनी सांगितलं की, प्राप्त तक्रारीच्या आधारावर FIR नोंदवण्यात आला आहे. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला तुरुंगात पाठवलं. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.