AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Crime | अंबाजोगाईत पुजाऱ्याची हत्या, गुढीपाडव्याला लाडका ‘देवबप्पा’ गेला, गावकरी हळहळले

गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरुने चाकूने अनेक वार केले

Beed Crime | अंबाजोगाईत पुजाऱ्याची हत्या, गुढीपाडव्याला लाडका 'देवबप्पा' गेला, गावकरी हळहळले
बीडमध्ये मंदिराच्या पुजाऱ्याची हत्याImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Apr 04, 2022 | 1:20 PM
Share

अंबाजोगाई : मंदिराच्या पुजाऱ्याचा चाकूने भोसकून खून (Priest Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाईच्या जवळ शेपवाडीत (Beed Crime) हा प्रकार घडला आहे. माथेफिरुने चाकूचे अनेक वेळा वार करुन पुजाऱ्याची हत्या केली. संतोष दासोपंत पाठक असं हत्या झालेल्या पुजाऱ्याचं नाव आहे. ते देवबप्पा या नावाने गावात परिचित होते. अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथे हनुमान मंदिराचे पुजारी होते. चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यानंतर पाठक गुरुजींना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नेमकं काय घडलं?

संतोष पाठक यांच्याकडे शेपवाडी गावातील सर्व पूजा अर्चा करण्यात येतात. गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते. दुपारी 1 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरुने चाकूने अनेक वार केले. ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या संबंधित अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन पिढ्यांपासून कुटुंबाचा आधार

“पाडव्याच्या शुभ दिनी शेपवाडी गावात अतिशय अशुभ घटना घडली. शेपवाडी गावचे पुरोहीत ज्यांच्या कुटुंबाचा आणि संपूर्ण गावाचा स्नेह मागच्या तीन पिढ्यांपासून आहे, अशा पाठक कुटुंबाचे सदस्य, आम्हा सर्व गावकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य असलेले संतोष पाठक (देवबप्पा) यांचा गावातील माथेफिरुने निर्घृण खून केला. अंबाजोगाई आणि परिसरात लोकप्रिय असलेले देवबप्पा आमच्या प्रत्येकासाठी वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक आणि धार्मिक आयुष्यात खूप महत्वाचे मार्गदर्शक होते. त्यांच्या अशा दुर्दैवी जाण्याने आम्हा गावकऱ्यांची गावाच्या इतिहासातील सर्वात मोठी हानी झाली” अशी भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे.

Beed Priest Murder 2

देवबप्पाला गावकऱ्यांची श्रद्धांजली

“याच भावनेतून पाठक कुटुंबाच्या ऋणातून आम्ही शेपवाडीकर कधीच उतराई होऊ शकत नाहीत. देवबप्पाच्या पावन आत्म्यास शांती लाभावी म्हणून रविवारी रात्री गावच्या मुख्य सभागृहामध्ये गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, सर्व ज्येष्ठासह, असंख्य महिला मंडळ, सर्व गावाच्या वतीने, अतिशय जड अंतःकरणाने, डबडबलेल्या डोळ्यांनी स्व. संतोष पाठक देवबप्पा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.” अशी माहिती विष्णूपंत शेप यांनी फेसबुकवर दिली आहे.

संबंधित बातम्या : 

बाजारात गेलेला नवरा परतलाच नाही, दुसऱ्या दिवशी रस्त्यात मृतदेह आढळला

माझ्या जवळ का येतोस, पत्नीने चापट मारली, पतीने जीव घेतला

फेब्रुवारीत शून्य हत्या, नागपूर पोलिसांनी पाठ थोपटली, मार्चमध्ये दहा हत्याकांड

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.