कॉलेज डीनच्या घरी 11 लाखांची चोरी, घरकाम करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

हिरे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या समोरच असलेल्या शासकीय निवासस्थानात राहतात. 12 ऑगस्ट रोजी दुपारी चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने , रोख रक्कम असे मिळून 11 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता.

कॉलेज डीनच्या घरी 11 लाखांची चोरी, घरकाम करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या
हिरे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेंच्या घरी चोरी

धुळे : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकाला धुळे शहरासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे. त्यात हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ पल्लवी सापळे यांच्या घरी झालेल्या चोरीचा छडा 48 तासात लावण्यात आला. देवपुरातील रेऊ नगरातील चोरीचाही उलगडा लावला असून चोरट्याने कबुली दिली .

हिरे महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या समोरच असलेल्या शासकीय निवासस्थानात राहतात. 12 ऑगस्ट रोजी दुपारी त्यांच्या घरी चोरी झाल्याने त्यांच्या मातोश्री डॉ. सुप्रिया प्रभाकर सापळे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने , रोख रक्कम असे मिळून 11 लाख 3 हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता.

घरकाम करणाऱ्या तिघांवर संशय

चोरीचा घटनाक्रम पाहता ही चोरी कोणीतरी माहितगाराने केली असावी यावर पोलीस ठाम होते. त्यानुसार एलसीबीने घरी काम करणाऱ्या वर्षावाडी मोहाडी उपनगरातील दोन महिला आणि मयूर चंद्रकांत बागुल (रा . पारोळा रोड , धुळे ) या तिघांना संशयावरून शुक्रवारी ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले 10 लाख 65 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

देवपुरातीलही घटना उघडकीस

एलसीबी पथकाने देवपुरातील अंबिका नगरातून इम्रान ऊर्फ बाचक्या खालीद शेख या संशयिताला ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने नकाणे रोडवरील रेऊ नगरात असलेल्या श्री हाईटस् अपार्टमेंटमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून एलसीबीने 28 हजार 550 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. दरम्यान, राजाराम चिंधा पाटील यांनी तक्रार दाखल केली.

पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित , अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत , पोलीस निरीक्षक नितीन देशमुख व योगेश राऊत , गायकवाड , रफिक पठाण , प्रभाकर बैसाणे , श्रीकांत पाटील , संजय पाटील , प्रकाश सोनार , गोतम सपकाळे , राहुल सानप , सुनील पाटील , विशाल पाटील , कविता देशमुरव , गुणवंत पाटील , दीपक पाटील यांनी कारवाई केली .

संबंधित बातम्या :

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीची चाकूने भोसकून हत्या, ऐन स्वातंत्र्यदिनी भररस्त्यातील प्रकार

अमरावतीत लिंबाच्या झाडाला PSI चा गळफास, ऑडिओ क्लीपमध्ये आत्महत्येचं कारण समोर

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI