तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून मित्राला संपवलं, अपघात असल्याचं भासवलं, जळगावातील हत्येचं गूढ अखेर उकललं

जळगावातील तरुणाच्या कथित अपघाती मृत्यू प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उलगडले आहे. तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मित्रांनीच तरुणाचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे.

तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून मित्राला संपवलं, अपघात असल्याचं भासवलं, जळगावातील हत्येचं गूढ अखेर उकललं
जळगावातील हत्येला अपघात भासवण्याचा प्रयत्नImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 3:19 PM

जळगाव : जळगावातील हत्या (Jalgaon Crime News) प्रकरणाचे गूढ उकलण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तरुणाची हत्या (Youth Murder) करण्यात आली. मित्रांनीच तरुणाचा जीव घेतल्याचा आरोप आहे. जळगावात गोलाणी मार्केटमध्ये ही घटना घडली. तिसऱ्या मजल्यावरुन ढकलून देत तरुणाची हत्या करण्यात आली होती. मुकेश राजापूर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलत हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या (CCTV Camera Footage) आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

जळगावातील तरुणाच्या कथित अपघाती मृत्यू प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उलगडले आहे. तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत तरुणाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. मित्रांनीच तरुणाचा खून केल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या सह त्यांचा साक्षीदार निखिल राजेश सोनवणे या तीन जणांना अटक केली आहे

नेमकं काय घडलं?

हत्या करुन मित्र स्वतः पोलिस स्टेशनला गेले होते. मुकेश इमारतीवरुन पडल्याचे त्यांना खोटं सांगत पोलिसांना अपघात असल्याचे भासवले. मात्र पोलिसांना या प्रकरणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी केली. त्यानंतर हा प्रकार अपघात नसून हत्या असल्याचं उघड झालं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा

हत्येला अपघात भासवला

मृत मुकेश राजपूत हा चायनीजच्या गाडीवर काम करत होता सोमवारी काम आटपून नेहमीप्रमाणे तो घरी निघून गेला तर में अमर उर्फ लखन बारोट व पराग उर्फ बबलू आरखे या दोघांनी मुकेशला पार्टी करायची असल्याचं सांगत गोलानी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर नेले.

या ठिकाणी दारू पीत असताना अमर व पराग या दोघांनी मुकेश सोबत वाद घातला. या वादातून दोन्ही मित्रांनी मुकेशला तिसऱ्या मजल्यावरून ढकलून देत त्याची हत्या केली. घटनेनंतर अमर उर्फ लखन व पराग उर्फ बबलू हे दोघे पोलीस स्टेशनला जाऊन मुकेश वरून पडल्याची बतावणी करत पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करत परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता मुकेशला वरून ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून पोलिसांनी अमर उर्फ लखन शांताराम बारोट व पराग उर्फ बबलू रवींद्र आरखे या दोघांना अटक केली असून त्यांचा सहकारी निखिल राजेश सोनवणे यास देखील पोलिसांनी अटक केली आहे.

Non Stop LIVE Update
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.