Sangli | ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, सांगलीत 25 किलोंचा गांजा आढळला

सांगली गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता ऊसाच्या शेतात एकूण 25 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. बाजार भावाप्रमाणे पंचनामा केला असता त्याची किंमत दोन लाख 57 हजार रुपये इतकी असल्याचं स्पष्ट झालं.

Sangli | ऊसाच्या शेतात गांजाची लागवड, सांगलीत 25 किलोंचा गांजा आढळला
सांगलीत ऊसाच्या शेतात गांजाची लागवडImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 10:52 AM

सांगली : ऊसाच्या शेतात चक्क गांजाची (cannabis) लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील मुंजेवस्ती येथे ही घटना उघडकीस (Sangli Crime) आली आहे. सांगली गुन्हे अन्वेषण यांनी छापा टाकला. यावेळी दोन लाख 57 हजार रुपये किमतीचा गांजा सापडला. 25 किलो 700 ग्रॅम इतक्या वजनाचा हा गांजा होता. उमदी पोलिसांनी शेतकऱ्याला (Farmer) ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

काय आहे प्रकरण?

पांढरेवाडी पासून दोन किलोमीटर अंतरावर मुंजे वस्ती आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली यांना खास खबऱ्याच्या मार्फत याविषयी माहिती मिळाली. अंबादास शेषापा तांबे यांच्या ऊसाच्या शेतात गांजा लागवड केल्याचं पोलिसांना समजलं.

25 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा

त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता ऊसाच्या शेतात एकूण 25 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. बाजार भावाप्रमाणे पंचनामा केला असता त्याची किंमत दोन लाख 57 हजार रुपये इतकी असल्याचं स्पष्ट झालं.

शेतकरी ताब्यात

सांगली गुन्हे अन्वेषण आणि उमदी पोलीस यांनी पंचा समक्ष अंबादास तांबे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभाग आणि उमदी पोलिसांनी कारवाई केली आहे.

संबंधित बातम्या :

कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी, एका कॉलमुळे नागपुरातील रॅकेटचा भांडाफोड

1 कोटी 85 लाखांचे दीड किलो ड्रग्ज जप्त, नवी मुंबईत वर्षातील सर्वात मोठी कारवाई

मूकबधीर तरुणाचा गोदामाला पहारा, महिलांकडून ने-आण, मुंबईत गांजा तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.