Shivsena VIDEO | हिंमत तर बघा! भर स्टेजवर शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून 50 हजारांचं बंडल ‘उडवलं’

Shivsena VIDEO | हिंमत तर बघा! भर स्टेजवर शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून 50 हजारांचं बंडल 'उडवलं'
सांगलीत शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून पैसे चोरी
Image Credit source: टीव्ही9

सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरट्याने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडली

शंकर देवकुळे

| Edited By: अनिश बेंद्रे

Mar 30, 2022 | 10:05 AM

सांगली : शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या खिशातून 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल (Note bundle) चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओबीसी मेळाव्यादरम्यान भर व्यासपीठावर ही घटना घडली. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीमध्ये नुकताच ओबीसी मेळावा पार पडला. यावेळी वडेट्टीवार स्टेजवर उपस्थित असतानाच हा प्रकार घडला. चोरट्याने सेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील नोटा लांबवतानाची घटना (Sangli Theft) कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चोराचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

सांगली शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्या खिशातील 50 हजार रुपयांच्या नोटांचं बंडल चोरट्याने चोरलं. सांगलीच्या स्टेशन चौकात काँग्रेस नेते, मदत आणि पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ओबीसी मेळाव्या दरम्यान ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

स्टेजवर जाऊन चोरट्याने शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या खिशातून नोटांचं बंडल लांबवण्याची हिंमत केली. व्यासपीठावर असलेल्या गर्दीचा फायदा घेत त्याने नोटा लांबवल्या. पैसे चोरतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

भाड्याने घर बघण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या वृद्ध महिलेला पोलिसांनी घातल्या बेड्या

सांगलीत चित्तथरारक पाठलाग करत पोलिसांनी पकडला चोरीला गेलेला ट्रॅक्टर

CCTV | आधी लांबून अंदाज घेतला, नंतर Activa उचलली, वसईतील धाडसी चोरी सीसीटीव्हीत कैद

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें