AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दारु पिताना शिवीगाळ, मित्राची हत्या करुन शरीराचे तुकडे कूपनलिकेत टाकले, सांगलीत थरकाप उडवणारा प्रकार

दत्तात्रय झांबरे 28 जुलैपासून बेपत्ता होता. दत्तात्रय हा अमोल आणि सागर या दोघांसोबत मद्यपान करत असताना शिवीगाळ करण्यावरुन तिघांमध्ये खटके उडाले. या रागातून अमोल आणि सागर या दोघांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे

दारु पिताना शिवीगाळ, मित्राची हत्या करुन शरीराचे तुकडे कूपनलिकेत टाकले, सांगलीत थरकाप उडवणारा प्रकार
सांगलीत दोघा मित्रांकडून तरुणाची हत्या
| Edited By: | Updated on: Aug 14, 2021 | 9:40 AM
Share

सांगली : मित्राची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मद्यपान करताना शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांनी मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे. सांगली जिल्ह्यात क्रौर्याची परिसीमा गाठणारा हा प्रकार घडला.

28 जुलैपासून तरुण बेपत्ता

24 वर्षांचा दत्तात्रय शामराव झांबरे हा तरुण 28 जुलैपासून बेपत्ता होता. जवळपास दोन आठवड्यांनी त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले आहे. अमोल ऊर्फ धर्मराज आनंदा खामकर (वय 27 वर्ष) आणि सागर सुरेश सावंत (वय 25 वर्ष) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे गावामध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला.

शरीराचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले

दत्तात्रय झांबरे 28 जुलैपासून बेपत्ता होता. दत्तात्रय हा अमोल आणि सागर या दोघांसोबत मद्यपान करत असताना शिवीगाळ करण्यावरुन तिघांमध्ये खटके उडाले. या रागातून अमोल आणि सागर या दोघांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. इतक्यावर न थांबता आरोपींनी दत्तात्रयच्या शरीराचे तुकडे केले आणि कूपनलिकेत टाकले. दत्तात्रयच्या खून प्रकरणी अमोल खामकर आणि सागर सावंत या दोघांनी कबुली दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

कोल्हापुरात दारुवरुन वादातून मित्राची हत्या

दरम्यान, दारुच्या नशेत वादावादी झाल्यानंतर मित्राने तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात घडली होती. राजू वसंत जाधव (34) असे मयत तरुणाचे नाव होते. दारुच्या अड्ड्यावर झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून राजूची हत्या करण्यात आली होती.

मुंबईत ऑनलाईन ल्युडोच्या वादातून मित्राची हत्या 

ऑनलाईन ल्युडो खेळताना झालेल्या भांडणातून तरुणाने मित्राचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील मालाड परिसरात काही महिन्यांपूर्वी घडला होता. हे प्रकरण इतक्यावरच थांबले नाही, तर मित्राच्या मृत्यूनंतर बोरिवलीतील एका हॉस्पिटलमधून आरोपीने बनवट मृत्यूचा दाखला बनवून घेतला. मयत तरुणाच्या कुटुंबाला नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवून अंत्यसंस्कारही करण्यात आले. मात्र तरुणाची शोकसभा सुरु असताना उपस्थित राहिलेल्या एका शेजाऱ्याने हा प्रकार सांगितला आणि आरोपीचं बिंग फुटलं

संबंधित बातम्या :

ल्युडोच्या वादातून मुंबईत मित्राची हत्या, नैसर्गिक मृत्यूचं बिंग शेजाऱ्याने शोकसभेत फोडलं

इचकरंजीत दारुच्या नशेत मित्राला दगडाने ठेचले, क्षुल्लक कारणावरुन मित्राकडून मित्राची हत्या

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.