मंदिराच्या रखवालदार दाम्पत्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या, वाशिममध्ये खळबळ

वाशिम जिल्ह्याच्या डव्हा येथील हे दाम्पत्य रहिवासी असून, गजानन निंबाळकर (वय 60) आणि निर्मला निंबाळकर -देशमुख (वय 55) अशी हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत. निंबाळकर दाम्पत्य हे गेल्या अनेक वर्षांपासून चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते.

मंदिराच्या रखवालदार दाम्पत्याची कुऱ्हाडीने वार करुन हत्या, वाशिममध्ये खळबळ
प्रातिनिधीक फोटो

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील चाकातीर्थ प्रकल्प परिसरात रखवालदार असलेल्या वृद्ध दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. घरात घुसून अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने वार करून या वयोवृद्ध रखलवालदाराची भर दुपारी हत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोण होते दाम्पत्य

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्याच्या डव्हा येथील हे दाम्पत्य रहिवासी असून, गजानन निंबाळकर (वय 60) आणि निर्मला निंबाळकर -देशमुख (वय 55) अशी हत्या झालेल्या वृद्ध दाम्पत्याची नावं आहेत. निंबाळकर दाम्पत्य हे गेल्या अनेक वर्षांपासून चाका तीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होते.

नेमकं काय घडलं?

रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारात अज्ञात हल्लेखोर ते राहत असलेल्या घरात शिरले आणि त्यांनी भीषण हल्ला चढवला. हल्लेखोरांनी गजानन निंबाळकर आणि निर्मला निंबाळकर यांची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली.

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

धक्कादायक म्हणजे, भर दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घराचे दार उघडे असल्याचे पाहून स्थानिकांनी निंबाळकर यांची विचारपूस करण्यासाठी गेले असता दोघांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.

हत्येचं कारण अस्पष्ट

पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. रखवालदार असलेल्या निंबाळकर वृद्ध दाम्पत्याची हत्या का आणि कशासाठी करण्यात आली असावी, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. पंचनामा करून दोघांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांसमोर आव्हान

या वृद्ध दाम्पत्याची हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली याचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका पोलीस श्वान पथकाच्या मदतीने पुढील तपास करीत आहेत. या दरम्यान हत्या झालेल्या ठिकाणी कुऱ्हाड मिळून आली असून, हत्या की आत्महत्या याचा तपास सुरूअसून, लवकरच तपास करून माहिती देणार असल्याचे पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितलं.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये वहिनीची चाकूने वार करुन हत्या केल्याच्या आरोपाखाली दीराला अटक करण्यात आली आहे. मुरादाबाद शहर पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी याविषयी माहिती दिली. कटघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी इम्रानची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

शनिवारी संध्याकाळी इम्रानने त्याची वहिनी प्रवीणची चाकूने भोसकून हत्या केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चौकशी सुरू आहे, असं पोलीस अधीक्षक अमित कुमार आनंद यांनी सांगितलं. मृत विवाहिता प्रवीणचे पती परवेज यांनी सांगितले की, जेव्हा ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सदस्य तळ मजल्यावर नमाज पठण करत होते. तर त्यांची पत्नी प्रवीण पहिल्या मजल्यावर होती. 37 वर्षीय महिला चार मुलांची आई होती.

संबंधित बातम्या :

वहिनीची चाकूने भोसकून हत्या, दीराला अटक

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI