AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुठे डंपर नदीत कोसळला, तर कुठे बाईकची समोरासमोर धडक, विविध अपघातात आई, जावयासह 8 ठार

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अनेक भीषण रस्ते अपघात घडले आहेत. लातूरमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर इतर घटनांमध्ये पुणे, कल्याण आणि विक्रोळी येथेही अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

कुठे डंपर नदीत कोसळला, तर कुठे बाईकची समोरासमोर धडक, विविध अपघातात आई, जावयासह 8 ठार
अपघातवारImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 20, 2025 | 12:46 PM
Share

राज्यात आज घातवार ठरला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याती भीषण अपघात झाला. कुठे डंपर नदीत कोसळला तर कुठे बाईकने समोरा समोर धडक दिल्याने मृत्यूशी गाठ पडली. राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एकूण 8 जण ठार झाले आहेत. यात आई, मुलगा आणि जावयाचाही समावेश आहे. या भीषण अपघातांचे पंचनामे नोंदवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

लातूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात सहाजण ठार झाल्याची घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातल्या घरणी उड्डाणपुलाजवळ दोन मोटरसायकलची सामोरा समोर धडक होवून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर लातूर शहरा जवळच्या बार्शी रस्त्यावरील उड्डाण पुलावर ट्रॅक्टर आणि रिक्षाची धडक झाली. या अपघातात देखील तिघांचा मृत्यू झाला आहे. घरनी येथे झालेल्या अपघातात आई, मुलगा आणि जावई असे एकाच कुटुंबातील तिघेजण मृत्यूमुखी पडले आहेत. गेल्या तीन दिवसातील हा तिसरा भीषण अपघात आहे. तीन दिवसांपूर्वी निलंगा जवळ मोटारसायकल आणि जीपच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मुलगा आणि आई वडील मृत्युमुखी पडले होते. तीन दिवसात लातूर जिल्ह्यातल्या तीन वेगवेगळ्या अपघातात नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत.

टेम्पो थेट शाळेत घुसला

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड जेजुरी पालखी महामार्गावरती खळद येथे रस्त्यालगत मोठा अपघात झाला. जिल्हा परिषद शाळेमध्ये आयशर टेम्पो घुसल्याने चालक जखमी झाला आहे. या अपघातामध्ये जिल्हा परिषद शाळेची नव्याने बांधलेली आरसीसी वर्ग खोली पुर्णपणे पडून मोठे नुकसान झाले आहे. आज पहाटेच हा मोठा अपघात झाल्याने मोठा अनुचित प्रकार टळला. शिवाय या अपघातात कोणतीही जिवित हानी झाली नाही.

सप्तश्रृंगी घाताच दरड कोसळली

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात काल दुपारच्या जोरदार पावसामुळे दरडीचे दगडगोटे पुण्याहून आलेल्या भाविकांच्या भाविकांच्या कारवर पडले. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघाताची माहिती मिळताच पोलीस, पोलीस मित्र आणि आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. मोठा गाजावाजा करून सप्तश्रृंगी गड घाटात दरड संरक्षण जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. मात्र तरी अशा दुर्घटना घडत असल्याने भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.

कल्याणमध्ये डंपर नदीत कोसळला

कल्याणच्या गांधारी ब्रिजवर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. रिक्षाला धडक देऊन डंपर ब्रिजचे कठडे तोडून नदीत कोसळला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू एकजण गंभीर जखमी झाला आहे. नदीत कोसळलेल्या डंपरचा ड्रायव्हर आणि अन्य एक जण बेपत्ता असल्याने अग्निशामक दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती वाहतूक अधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दिली आहे.

विक्रोळीत दोन वाहने पलटली

मुंबईतील विक्रोळीतही भीषण अपघात झाला आहे. विक्रोळीच्या नारायण बोधे पुलावर हा अपघात झाला. मुंबईवरून ठाण्याच्या दिशेने जात असताना टेम्पोने टाटा सफारीला धडक दिली. त्यामुळे दोन्ही गाड्या रस्त्यावरच पलटी झाल्या. टाटा सफारी तर रस्त्याच्या दुसऱ्या मार्गावर जाऊन पलटी झाली इतका भीषण हा अपघात होता. आज पहाटे 6 वाजून 40 मिनिटांनी हा अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाडीमधील चालक किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर दोन्ही मार्गिकेवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.

जळगावात रिक्षा चालकाचा मृत्यू

जळगावच्या अमळनेर येथे भरधाव वेगात आलेल्या चारचाकीची प्रवाशी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक बसली आहे. या भीषण अपघातात रिक्षामधील चालकाचा मृत्यू झाला आहे. भटू पाटील असे मयत रिक्षाचालकाचे नाव आहे. अमळनेरमधील मंगरूळ एमआयडीसी जवळ आज सकाळी 7 वाजता हा भीषण अपघात झाला. चारचाकी वाहनाची धडक एवढी जोरदार होती की, अपघातात रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.