घनदाट जंगलात महाराष्ट्र पोलिसांचा धमाका, नक्षलवाद्यांचा हत्यारांचा अड्डा उद्ध्वस्त, जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर्स

Gadchiroli Naxal arms manufacturing factory : गडचिरोली आणि छत्तीसगड सीमेवरील घनदाट जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. गेल्या 48 तासात तीन वेळा फायरिंग झाली.

घनदाट जंगलात महाराष्ट्र पोलिसांचा धमाका, नक्षलवाद्यांचा हत्यारांचा अड्डा उद्ध्वस्त, जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर्स
Gadchiroli Maharasthra Encounter of state police spl unit C-60 and naxals

गडचिरोली : गडचिरोली आणि छत्तीसगड (Gadchiroli Naxal) सीमेवरील घनदाट जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. गेल्या 48 तासात तीन वेळा फायरिंग झाली. एटापल्ली- भामरागड तालुक्याच्या सीमेवर, छत्तीसगड भागाला लागून असलेल्या अबूझमाड जंगलात घुसून सुरक्षारक्षकांनी धमाका केला. ऑपरेशन ग्रीन हंट” अंतर्गत, पोलिसांनी नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त केला. इतकंच नाही तर पोलिसांनी नक्षल्यांचा हत्यारं बनवणारा अड्डा उद्ध्वस्त केला. (Naxal arms manufacturing factory) पोलिसांच्या हाती लागलेलं हे मोठं यश आहे.

अबूझमाड जंगल ( Abujhmad) परिसरात गडचिरोली पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये तीनवेळा चकमक झाली. यात एका पोलीस जवानाच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Maharashtra HM Anil Deshmukh) यांनी दिली.

दरम्यान पोलीस जवानांच्या सहकार्यासाठी हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले आहेत. तसेच अहेरी येथील प्राणहिता पोलीस कॅम्पमधून पोलीस जवान पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आले आहेत.

या चकमकीत छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात गडचिरोली नक्षलविरोधी पथकाचे तब्बल 60 जवान सर्च ऑपरेशन राबवत होते. मात्र नक्षल्यांनी पथकाला घेरल्यानंतर जोरदार धुमश्चक्री उडाली. या चकमकीत नक्षल्यांसाठी हत्यारं बनवणारा अड्डा उद्ध्वस्त करण्यात पोलीस जवानांना यश आलं. पोलिसांच्या सी-60 पथकाने ही कामगिरी केल्याने त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. नक्षल्यांविरोधात भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात गेल्या 48 तासांपासून कारवाई सुरु होती.

पोलीस उपमहानिरिक्षक संदीप पाटील

गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांचा कोअर एरिया असलेल्या माडच्या जंगलात शिरुन मोठं ॲापरेशन राबवलं. तीन दिवस चाललेल्या या ॲापरेशनमध्ये अनेक चकमकी झाल्या. यात अनेक नक्षलवाद्यांचा खात्मा झाला असून, आपल्या पोलिसांनी छत्तीसगड सीमेच्या आत असलेला नक्षलवाद्यांचा शस्त्रांचा कारखाना उध्वस्त केलाय. गेल्या काही वर्षातलं गडचिरोली पोलिसांचं नक्षलवाद्यांच्या विरोधातलं हे सर्वात मोठं ॲापरेशन आहे. यासाठी एअरफोर्सचीही मदत घेण्यात आली होती, अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उप उपमहानिरिक्षक संदीप पाटील यांनी दिली

गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

संबंधित बातम्या 

नक्षलविरोधी कारवाईला मोठं यश, जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला बेड्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI