AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबारच्या चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात; 10 प्रवासी गंभीर जखमी

चरणमाळ घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले आणि ती बस पलटी होऊन घाटाच्या पायथ्याशी कोसळली आहे.

नंदुरबारच्या चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात; 10 प्रवासी गंभीर जखमी
नंदुरबारमध्ये चरणमाळ घाटात लक्झरीला भीषण अपघात
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 12:44 AM
Share

नंदुरबार : राज्यात अनेक भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बहुतांश रस्त्यांवर छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अशातच शनिवारी रात्री नंदुरबार जिल्ह्यातील चरणमाळ घाटात खाजगी लक्झरी बस (Luxury Bus)ला भीषण अपघात (Accident) झाला आहे. त्यात आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी (Injured) झाले असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. मुसळधार पावसामुळे मदतकार्यामध्ये अडचणी येत आहेत.

नंदुरबारच्या नवापूर तालुक्यात चरणमाळ घाट आहे. हा घाट आधीच अरुंद आणि काही ठिकाणी धोकादायक वळणांचा आहे, त्यातच मुसळधार पावसात या घाटातून मोठ्या गाड्या चालवणे फार अवघड असते.

अशा परिस्थितीत अपघातांना निमंत्रण मिळते. आज रात्री खाजगी लक्झरी बसला झालेला भीषण अपघातही घाटाच्या धोकादायक स्थितीमुळे घडल्याचे बोलले जात आहे.

घाटातील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

चरणमाळ घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले आणि ती बस पलटी होऊन घाटाच्या पायथ्याशी कोसळली आहे.

अपघाताची भीषणता तीव्र आहे. त्यामुळे जखमी प्रवाशांना गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमधील 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी

बसमध्ये एकूण 30 प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. त्यापैकी किमान 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच घाटापासून काही अंतरावर असलेल्या स्थानिक रहिवाशांनी घाटाच्या दिशेने धाव घेतली.

रहिवासी आणि पोलिसांनी जखमींना वेळीच अपघातग्रस्त लक्झरीमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. यातील ज्या जखमींना बाहेर काढण्यात आले, त्यांना तातडीने खाजगी गाड्यांतून उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

पावसामुळे मदतकार्यात अडचणी

घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिक आणि पोलीस प्रशासनाकडून सुरु असलेल्या मदतकार्यामध्ये अडचणी येत आहेत. लक्झरीचा चालक बसखाली अडकला आहे. त्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले जात आहेत.

अपघातस्थळी मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक नागरिकांनी हजेरी लावली आहे. अपघाताचे नेमके कारण काय आहे, याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Follow Us
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं
पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांनी सुनावलं.
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक......
सरकारी ताफ्याला ब्रेक! वर्षा ते विधान भवन, मुख्यमंत्री ऑन बाईक.......
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP...
25 लाखात चक्क 16 महिने... 20 वर्ष जुन्या हत्या प्रकरणाचा निकाल, NCP....
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ
मी ईश्वर साक्ष ठेवून शपथ घेतो की... 10 विधान परिषद सदस्यांनी घेतली शपथ.
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!
तुम्हालाही हे माहीत हवं... फडणवीस सरकारचा काटकसरीचा फॉर्म्युला!.
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत
VIP गाडी नाही, थेट बसने प्रवास! नितीन गडकरींची पुण्यातील एंट्री चर्चेत.
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो
भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरो.
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे...
अवकाळीचा कहर! साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, झाडं कोसळली, 40 घरांचे....
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली..
भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा! खरातच्या दरबारात कुणा कुणाची नांदी, अंजली...
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी.....
मोठी बातमी! आता सकाळचा चहा पोळणार... दुधाला महागाईची उकळी......