AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकप्रिय मालिकेत ‘राधिका सुभेदार’ची एण्ट्री; कथानकात मोठा ट्विस्ट

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत राधिका सुभेदारची भूमिका साकारलेली अभिनेत्री अनिता दाते आता एका लोकप्रिय मालिकेत एण्ट्री करत आहे. तिच्या या पात्रामुळे मालिकेच्या कथानकात मोठा ट्विस्ट येणार आहे.

| Updated on: May 14, 2026 | 1:34 PM
Share
'सनई चौघडे' ही मालिका सध्या अत्यंत रंजक वळणावर आली आहे. जय आणि शर्वरी यांच्या संघर्षात आता एका अशा पात्राची एण्ट्री होत आहे, जिने संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे. प्रेक्षकांची लाडकी 'राधिका सुभेदार' म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते मालिकेत महत्वाची भूमिका साकारणार आहे.

1 / 5
याविषयी अनिता दाते म्हणाली , "'सनई चौघडे'च्या सेटवर येऊन मला खूप आनंद होत आहे आणि हा आनंद द्विगुणित झाला आहे कारण मला पुन्हा एकदा 'राधिका सुभेदार' भेटली आहे. 'सनई चौघडे'मध्ये राधिका सुभेदारची एण्ट्री होणार आहे. याच भूमिकेनं अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. 2016 ते 2021 अशी साडेचार वर्षे मी या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत होते. आज पुन्हा एकदा ही भूमिका साकारताना मला खूप अभिमान वाटतोय."

2 / 5
जेव्हा राधिका सुभेदार जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये येईल, तेव्हा जय आणि शर्वरीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. जयच्या ऑफिसमध्ये कोणत्याही स्त्रीला जागा नाही किंवा महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी तिची निवड होणार नाही, हे सर्वांनाच ठाऊक आहे. पण तिथे राधिका येईल आणि आपली जादू दाखवेल हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शर्वरीला पुन्हा कंपनीत आणण्यासाठी ती प्रयत्न करेल.

3 / 5
"राधिका सुभेदारने केवळ माझंच आयुष्य बदललं नाही, तर महाराष्ट्रातील अनेक महिलांना प्रेरणा दिली आहे. अनेक महिलांनी स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू केले आणि आज त्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. जेव्हा त्या मला भेटतात, तेव्हा त्या आवर्जून सांगतात की हा राधिका सुभेदारचा चमत्कार आहे. हे यश केवळ माझं नसून झी मराठीची संपूर्ण टीम आणि त्यांच्या मेहनतीचं फळ आहे," अशी प्रतिक्रिया अनिता दातेनं दिली.

4 / 5
जय खानोलकरच्या ऑफिसमध्ये जिथे महिलांना स्थान नाही, तिथे राधिका आपल्या कर्तृत्वाने आणि जिद्दीने कोणते बदल घडवून आणते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरेल.  'सनई चौघडे' ही मालिका दररोज रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?