सावधान… ‘त्या’ बुरखा घालून येतात आणि सोनं पळवून नेतात; ज्वेलर्सच्या रडारवर
मुंबईतील ज्वेलर्सच्या दुकानात बुरखा घालून शिरणाऱ्या आणि दागिने लंपास करणाऱ्या एका टोळीचा सुळसुळाट सुरु आहे. या महिला दुकानदाराला बोलण्यात गुंतवून मोठ्या शिताफीने चोरी करायच्या. या प्रकरणी तिघा जणींना पोलीसांनी अटक केली आहे.
गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई | 6 डिसेंबर 2023 : शहरातील ज्वेलर्स दुकानात बुरखा घालून प्रवेश करायचा आणि दुकानदाराला बोलण्यात गुंतवून दागिन्यांवर डल्ला मारायचा असा प्रकारे लुबाडणूक करणाऱ्या महिला चोरांचा छडा लावण्यात पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणात सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी तीन महिलांना मालवणी येथून अटक केली आहे. या महिलांनी आणखी काही ठिकाणी अशा प्रकारे चोरी केल्याचा संयश असल्याने ज्वेलर्सनी बुरखादारी महिलांपासून सावध रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्वेलर्सच्या दुकानातून दागिने चोरणाऱ्या एका महिला त्रिकूटाचा पोलिसांनी छडा लावला आहे. या महिला दुकानात बुरखा परिधान करुन तीन ते चार मैत्रिणींच्या दागिने चोरायच्या अशी तक्रार आली होती. अशा प्रकारची तक्रार आल्यानंतर मालवणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. या प्रकरणात तीन महिलांना अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात साजिदा बशीर अन्सारी उर्फ अन्नू (45), ताहिरा खुर्शीद अहमद अन्सारी (35), मुबशिरा मोहम्मद रिजवान अन्सारी ( 30) या महिला आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातीस एक आरोपी नाशिक मालेगावचा आहे.
आणखी कुठे गुन्हे केले ?
या संदर्भात मालवणी पोलिसांनी सांगितले की, 22 नोव्हेंबर रोजी बुरखा परिधान केलेल्या तीन महिला मालवणी येथील पूजा ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या आणि तिघींपैकी एकीने अत्यंत सफाईने सोन्याची बांगडी चोरली होती. या सोन्याच्या बांगड्यांची किंमत तीन लाख असून त्यांना हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे. या तिघा महिलांवर ज्वेलरीच्या दुकानातून दागिने चोरी केल्याचे तीन गुन्हे देखील कुर्ला पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या महिलांनी मुंबईत आणखी कोणत्या ज्वेलर्सच्या दुकानातून अशा प्रकारे सोने चोरले आहे का ? आणि त्यांच्यासोबत या टोळीत आणखी किती जणांचा सहभाग आहे ? याचा तपास पोलिस करत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी सांगितले आहे.