‘पाच किलो मटण दे’, पैसे मागताच राग अनावर, साथीदारांना बोलवून दुकानदाराची हत्या

मटणाचे पैसे मागितले म्हणून एका नराधमाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मटण दुकानदाराची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

'पाच किलो मटण दे', पैसे मागताच राग अनावर, साथीदारांना बोलवून दुकानदाराची हत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 12:45 AM

पाटणा : मटणाचे पैसे मागितले म्हणून एका नराधमाने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मटण दुकानदाराची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दुकानदाराची हत्या करणारा आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने नशेत आपल्या साथीदारांच्या सहकार्याने हे कृत्य केलं. या घटनेनंतर मृतक दुकानदाराला न्याय मिळावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

संबंधित घटना ही बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील एकवारी या गावात घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव चौधरी असं असल्याची माहिती आहे. त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने मटण दुकानदाराची हत्या केली. पोलीस त्या सर्व आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच पोलिसांनी मुख्य आरोपी असलेल्या चौधरीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

आरोपी चौधरी हा मद्यधुंद अवस्थेत मंगळवारी (21 ऑगस्ट) मृतक अयोध्या साह यांच्या दुकानात आला. साह यांचं मटण आणि मासे विक्रीचं दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे विक्री करत असताना आरोपी चौधरी हा तिथे आला. त्याने साह यांच्याकडे पाच किलो मटण मागितले. आरोपी हा दारुच्या नशेत असल्याने साह यांनी आधी त्याच्याकडे पैशांची मागणी केली. याच गोष्टीचा राग आरोपीला आला. त्याने थेट साह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतलं. त्यानंतर आरोपींनी साह यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ले केले. या हल्ल्यात साह गंभीर जखमी झाले. आरोपींनी साह यांना गंभीर जखमी करुन नदीकिनारी फेकून दिलं.

या दरम्यान साह यांच्या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला. त्यांनी परिसरात आरडाओरडत करत इतर नागरिकांना सोबत नेवून साह यांना रुग्णालयात नेलं. पण साह यांची प्रकृती नाजूक होती. त्यामुळे डॉक्टरांनी साह यांना तातडीने पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सर्व तयारी करुन साह यांना उपचारासाठी पाटण्याच्या रुग्णालयात नेलं जात होतं. पण पाटण्यात रुग्णालयात पोहचण्याआधी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

दरम्यान, संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांना माहिती पडतचा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींचे मतं जाणून घेतली. त्यानंतर पोलिसांनी मृतक साह यांच्या नातेवाईकांचा जबाब नोंदवून घेतला. पोलिसांनी सर्व बाजूंनी माहिती घेऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या फरार आहेत. पोलीस त्यांचा लवकर शोध घेतील, अशी आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

धक्कादायक! स्कूटीने कट मारल्याने हाणामारी, लाल रंगाने केला घात, थरारक घटनेने मिराभाईंदर हादरले

आई-वडील, बहीण, आजी, कुणालाच सोडलं नाही, तरुणाने सगळ्यांना संपवलं, कारण ऐकून पोलीसही चक्रावले

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.