पोटच्या मुलींसमोर त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर 300 वेळा वार, नराधम पतीचं संतापजनक कृत्य, संपूर्ण जग हळहळलं !

पोटच्या मुलींसमोर त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर 300 वेळा वार, नराधम पतीचं संतापजनक कृत्य, संपूर्ण जग हळहळलं !
सांकेतिक फोटो

एका नराधमाने त्याच्या 57 वर्षीय पत्नीच्या चेहऱ्यावर चक्क 30 वेळा वार करुन तिची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Man killed his wife in front of his three daughter).

चेतन पाटील

|

Apr 12, 2021 | 12:07 AM

लंडन : ब्रिटनमध्ये गेल्यावर्षी घडलेल्या प्रचंड भयानक आणि क्रूर घटनेची सध्या संपूर्ण जगात चर्चा आहे. एका नराधमाने त्याच्या 57 वर्षीय पत्नीच्या चेहऱ्यावर चक्क 30 वेळा वार करुन तिची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी ब्रिटनच्या कोर्टाने नुकताच निकाल जाहीर केलाय. कोर्टाने आरोपी पतीला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात नराधमाची मुलगी ही साक्षीदार होती. तिच्या जबाबाच्या आधारावर कोर्टाने हा निकाल दिला आहे (Man killed his wife in front of his three daughter).

नेमकं प्रकरण काय?

ब्रिटनच्या लिव्हरपूर भागात जॉर्ज लेदर नावाच्या नराधमाने 16 नोव्हेंबर 2020 रोजी त्याच्याच पत्नीची निघृणपणे हत्या केली. मृतक महिलाचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत, असा संशय 60 वर्षीय आरोपीला होता. याच संशयातून त्याने चार चाकूंच्या आधारे महिलेच्या चेहऱ्यावर तब्बल 300 वेळा वार करुन हत्या केली (Man killed his wife in front of his three daughter).

मुलींसमोर पत्नीची हत्या

आरोपी आणि मृतक महिलेला तीन मुली आहेत. संबंधित घटनेच्या वेळी तीनही मुली घरातच होत्या. आरोपीने मुलींच्या समोर त्यांच्या आईची हत्या केली. आईच्या हत्येनंतर आम्ही रडत होतो, त्यावेळी आमचा नराधम बाप हा बाथरुममध्ये आंघोळ करत होता. त्या क्षणापासून आमच्या आईसोबत आमचा बापही मेला असं आम्ही मनाशी ठाम केलं, असं आरोपीच्या मुलीने कोर्टात सांगितलं.

नराधमाकडून 20 वर्षांपासून महिलेचा छळ

आरोपी महिलेला गेल्या वीस वर्षांपासून छळत होता, अशी माहिती मुलीने कोर्टात दिली. आरोपी महिलेला दररोज त्रास द्यायचा. याप्रकरणी मुलींनी आरोपी वडिलाविरोधात बंड पुकारल्याने त्याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीचा 18 वर्षांचा कारावस पूर्ण झाल्याशिवाय त्याला पेरोलवर सुट्टी मिळणार नाही, असंही कोर्टाने शिक्षेची सुनावणी करताना स्पष्ट केलं आहे. याबाबतची सुनावणी शुक्रवारी (9 एप्रिल) झाली. या सुनावणीनंतर संपूर्ण जगभरात या प्रकरणाची चर्चा होत आहे.

हेही वाचा : संशयाची सुई, त्यानं बायकोवर भर रस्त्यात चाकुचे सपासप वार केले, लोक काय करत होते?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें