AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चारित्र्यावर संशय आणि ‘ती’ इच्छाही अपूर्णच… म्हणून पतीने थेट पेट्रोलच टाकले…

पत्नीने पतीची एक इच्छा पूर्ण केली नाही म्हणून त्याने सर्वांदेखत तिच्यावर पेट्रोल टाकले आणि.... ते दृश्य पाहून सर्वच हादरले

चारित्र्यावर संशय आणि 'ती' इच्छाही अपूर्णच... म्हणून पतीने थेट पेट्रोलच टाकले...
पैशाच्या वादातून पत्नीने पतीचे गुप्तांग कापले
| Updated on: Jun 17, 2023 | 1:10 PM
Share

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील चेंबूर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा (husband sets wife ablaze) प्रयत्न केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुलगा होऊ शकला नाही या कारणावरून आरोपी पत्नीशी दररोज भांडण करत असे. वाद टाळण्यासाठी पीडित महिला तिच्या मुलींना सोबत घेऊन बहिणीच्या घरी राहायला गेली होती. तेव्हा संतापलेल्या आरोपीने मेहुणीच्या घरी जाऊन पत्नीच्या अंगावर पेट्रोल शिंपडून तिला पेटवून (crime news) दिले. संजय ठाकूर असे ३७ वर्षीय आरोपीचे नाव आहे.

पीडित महिलेला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजते.

चारित्र्यावर होता संशय, मुलगा होत नसल्यानेही भडकला पती

आरोपीला ठाकूरला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावरही संशय होता. रोजच्या भांडणांना कंटाळून त्याची पत्नी मुलींसह बहिणीकडे रहायला गेली होती. मात्र तिचे दुसऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याने त्याला भेटायला गेली, असा संशय आरोपीला आला. तो तडक त्याच्या मेहुणीच्या घरी गेला. पीडिता तेव्हा कामावर जाण्यासाठी निघाली होती, तेव्हाच आरोपीने तिला रोखले आणि तिच्यावर पेट्रोल शिंपडून सिगारेट लायटरने पेटवून दिले. त्यानंतर इस्माईल शेख नावाच्या रिक्षाचालकाने तातडीने तिच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांनी पीडित महिलेला सायन रुग्णालयात दाखल केले.

चारही मुलीच झाल्याने नाराज होता आरोपी

पीडितेच्या भावाने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, पीडित महिला आणि संजयचे १३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना चार मुली आहेत. संजयला मुलगा हवा होता. त्यामुळे तो सरिताला रोज मारहाण करायचा. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि तिचे दुसऱ्याशी संबंध असल्याचे सांगत असे. यामुळे वैतागलेल्या पीडित महिलेने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. तरी त्यांचे वाद थांबत नव्हते. अखेर वैतागलेली पीडित महिला तिच्या बहिणीच्या घरी राहायला गेली. त्यामुळे आरोपी जास्त खवळला आणि दारू पिऊ लागला. याच रागात आणि नशेत त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.

सध्या पीडितेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.