AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुम्ही नीट रहा माझ्याशी’ म्हणत सहकार विभागातील महिला अधिकाऱ्याची मनसेच्या मनोज निकम यांना दमदाटी

सहकार विभागातील सहनिबंधक महिला अधिकाऱ्याकडून पुण्यातील मनसेचे पदाधिकारी मनोज निकम यांना धमकावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिला पदाधिकाऱ्याने निकम यांना बघून घेईल, असे धमकावत असल्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

'तुम्ही नीट रहा माझ्याशी' म्हणत सहकार विभागातील महिला अधिकाऱ्याची मनसेच्या मनोज निकम यांना दमदाटी
पुणे मनसे
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:50 PM
Share

पुणे – शहरातील सहकार विभागातील सहनिबंधक महिला अधिकाऱ्याकडून पुण्यातील मनसेचे पदाधिकारी मनोज निकम यांच्यावर दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित महिला पदाधिकाऱ्याने निकम यांना बघून घेईल,  अशी दमदाटी करत असल्याचा व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी मनोज निकम यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

निकम यांनी दिलेल्या अर्जाचे वाचन करत असताना संबंधित महिला अधिकारी म्हणाल्या ,’ तुम्ही अजिबात आवाज चढवून बोलू नका. आम्ही देवू शकतो शकतो पण तुम्ही म्हटलांना की निपक्षपातीपणे चौकशी व्हावी म्हणून , पण तुम्ही आधी मला सांगायला हवे होते की तुमचीपण तक्रार आहे’

यावर निकम यांनी ‘ तुम्हाला होत नसेल तर आम्हाला तसं लेखी उत्तर द्या, की आम्ही तुम्हाला न्याय देवू शकता नाही’, असे म्हटले.

त्यावर महिला अधिकाऱ्याने ‘आम्ही बोलेलो नाही अजून’, असे म्हटले

पुढे या महिला अधिकाऱ्यांने तुम्ही नीट रहा माझ्याशी. मी अजून काही बोललेले नाही , तुम्ही काही एक्स्ट्रा बोलू नका. तुम्ही अधिकाऱ्यांनाच ब्लॅकमेल करत आहात , तुम्ही आल्यापासून तुमचा आवाज वर आहे. तुम्ही एका अधिकाऱ्याची स्पष्टपणे बाजू घेताय अन दुसऱ्या अधिकाऱ्याला शिव्या देताय अक्षरश. अन मी बोलतेय नीट तर मला बघा मला धमकी देतायत हातवारे करताय असे म्हणत अरेरावी केल्याचे निकम यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा

‘समृद्धी’वरचा आकर्षक टोल प्लाझा, जणू जमिनीवर उतरला सुंदर पक्षी! औरंगाबादमधील जांभळा गावचे दृश्य

Bank Holidays: ‘या’ सहा दिवशी बँकांना सुट्टी; चला, तातडीचे आर्थिक व्यवहार लवकर करा!

काय सांगता? पेट्रोलच्या किंमती अमेरिका ठरवते, औरंगाबादेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा अजब जावईशोध!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.