मनसुख हिरेन यांच्या वकिलाची NIA चौकशी, वाझेंनीच अ‍ॅड. गिरींशी ओळख करुन दिल्याचा पत्नी विमलांचा दावा

स्फोटक सापडल्याच्या प्रकारानंतर मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांकडे तक्रार केली होती. (Mansukh Hiren Adv HK Giri NIA )

मनसुख हिरेन यांच्या वकिलाची NIA चौकशी, वाझेंनीच अ‍ॅड. गिरींशी ओळख करुन दिल्याचा पत्नी विमलांचा दावा
मनसुख हिरेन यांचे वकील अॅड एचके गिरी (उजवीकडे)
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 3:21 PM

मुंबई : मनसुख हिरेन (Mansukh Hiren death case) यांचे वकील के एच गिरी यांची एनआयए अधिकारी चौकशी करत आहेत. मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणाचा तपास करण्यासाठी हिरेन यांच्या वकिलांना एनआयने बोलावलं. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनीच अ‍ॅड के एच गिरी यांच्याशी पतीची ओळख करुन दिली, असा दावा मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला होता. (Mansukh Hiren Adv HK Giri NIA Enquiry in Mukesh Ambani Bomb Scare)

मनसुख हिरेन यांच्यातर्फे गिरींची तक्रार

स्फोटक सापडल्याच्या प्रकारानंतर मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतरांकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने एनआयए अधिकारी चौकशी करत आहेत. के एच गिरी हे मुंबई हायकोर्टातील वरिष्ठ वकील आहेत. मनसुख हिरेन यांच्यातर्फे गिरींनी तक्रार केली होती. 25 फेब्रुवारी रोजी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटीनने भरलेली गाडी सापडली होती. ही गाडी मनसुख हिरेन यांची असल्याचं उघडकीस आलं होतं.

मनसुख हिरेन यांची अनेक यंत्रणांद्वारे चौकशी

मनसुख हिरेन यांना त्याच दिवशी एटीएसने ताब्यात घेऊन चौकशी करायला सुरुवात केली होती. त्यानंतर मनसुख सतत चर्चेत राहिले होते. त्यांना अनेक यंत्रणा चौकशीसाठी बोलावत होत्या. यामुळे मनसुख त्रस्त झाले होते. त्यांनी त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त यांना सविस्तर निवेदन दिलं होतं. त्यात त्यांनी आपला छळ होत असल्याचं म्हटलं होतं. हे सविस्तर निवेदन अ‍ॅड के एच गिरी यांनी मनसुख यांना ड्राफ्ट करुन दिलं होतं. मनसुख हिरेन यांचा मृतदेह 5 मार्चला मुंब्य्रातील रेतीबंदर परिसरात सापडला होता.

सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांची अ‍ॅड के एच गिरी यांच्यासोबत ओळख करुन दिली होती, असा दावा मनसुख यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर अ‍ॅड के एच गिरी यांची चौकशी होत आहे.

हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडे (NIA) सुपूर्द करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (ATS) हा मोठा धक्का मानला जात आहे.

संबंधित बातम्या :

ATS ला धक्का, मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द

अंधुक दिवे, रस्त्यावर खुणा, कुर्ता घातलेले सचिन वाझे, NIA ने कसे केले नाट्य रुपांतरण?

(Mansukh Hiren Adv HK Giri NIA Enquiry in Mukesh Ambani Bomb Scare)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.