गैरहजेरीच्या परवानगीसाठी कॉलेजला गेला आणि वर्गातच गळफास घेतला, नगरच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ

गैरहजेरीच्या परवानगीसाठी कॉलेजला गेला आणि वर्गातच गळफास घेतला, नगरच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येने खळबळ
नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक म्हणून काम करत होते.

राज्यात दिवसेंदिवस तरुणांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ (Minor Student Died By Suicide) होत चालली आहे.

Nupur Chilkulwar

|

Feb 25, 2021 | 2:18 PM

अहमदनगर : राज्यात दिवसेंदिवस तरुणांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ (Minor Student Died By Suicide) होत चालली आहे. आज अहमदनगरातील शेवगाव शहरातील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना उघडकीस आली (Minor Student Died By Suicide).

शेवगावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने महाविद्यालयातील वर्गखोलीतच आत्महत्या केली आहे. हा अल्पवयीन मुलगा हा इयत्ता 11 अकरावी कॉमर्सचं शिक्षण घेत होता. या मुलाने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेले नाही.

वर्गखोलीतच गळफास

या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या रिकाम्या वर्गात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. सकाळी सात वाजता अकरावीच्या वर्गात विद्यार्थी आले असता खिडकीतून शेजाराच्या रिकाम्या वर्गात छताच्या पाईपला विद्यार्थ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.

अल्पवयीन मुलगा बुधवारी (24 फेब्रुवारी) दुपारपासून तो बेपत्ता होता. आज सकाळी मुलं कॉलेजमध्ये आल्यानंतर तो वर्गात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हा अल्पवयीन मुलगा हा शेवगावच्या पवार वस्ती येथे राहत होता. त्याच्या पश्चात आई आणि तीन विवाहित बहिणी आहेत.

शाळेतून सुट्टीची परवानगी घेऊन येतो, असं ओआईला सांगितलं

दरम्यान, मी दोन-तीन दिवस शाळेत येणार नाही, अशी शिक्षकाची परवानगी घेऊन येतो, असे आईला सांगून तो घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर तो लवकर घरी परत आला नसल्याने आई लक्ष्मीबाई पवार यांनी त्याचा शोध घेतला. बुधवारी रात्री 11 वाजता शेवगाव पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली होती (Minor Student Died By Suicide).

महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य करमसिंग वसावे यांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. सहपोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस नाईक अभिषेक बाबर, रामहरी खेडकर यांनी घटनास्थळी दाखल होत मयत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांसमक्ष पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

याबाबत मयताचा चुलत भाऊ संतोष बाबासाहेब म्हस्के यांनी पोलिसांत आत्महत्येची तक्रार दाखल केली असून आत्महत्या कशामुळे केली याचा पोलीस तपास करीत आहेत.

Minor Student Died By Suicide

संबंधित बातम्या :

मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कारवाई होणार: अनिल देशमुख

ज्या पूजा चव्हाणने आत्महत्या केली, तिच्यावर नेमकं काय म्हणाले संजय राठोड? वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें