सुनेच्या मोबाईलवरून सासूने मेसेज केला, प्रियकर भेटायला येताच दे दणादण
अमरोहामध्ये एका महिलेने तिच्या मुलाच्या बायकोची अर्थात तिच्या सुनेची भररस्त्यात सर्वांसमोरच धुलाई केली. सुनेच्या मोबाईलमधले मेसेज पाहून सासू भडकली आणि तिने सर्वांसमोर तिचं गुपित फोडलं.

नवरा-बायकोचं नातं खूप खास असतं. प्रेम तर असतंच पण एकमेकांवर विश्वास हा लग्नाचा, नात्यातच सर्वात मोठा पाया असतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक नसाल तर मात्र लग्न किंवा कोणतंही नातं टिकणं हे खूप कठीण असतं. धोका देणं, पसवणूक करणे हे काही काळ लपवता येतं पण एक ना एक दिवस त्याचा भांडाफोड होतोच. अमरोहामध्ये राहणारी एक महिला अशाच प्रकारे आपल्या पतीला धोका देत होती. फेसबूकवरच्या एका तरूणावर तिचं प्रेम जडलं, पण अखेर त्याचं सत्य समोर आलंच.
महिलेने पतीची फसवणूक करण्यासाठी सर्व प्लानिंग केलं होतं. पती सकाळी ऑफिसला गेला की ती महिला दिवसभर प्रियकराशी गप्पा मारत असे. घरातील काम सोडून आपली सून मोबाईलवर मेसेजेस करत बसल्याचं सासूने बरेच दिवस पाहिलं आणि तिला संशय आला. काही दिवसांनी तिने सुनेच्या मोबाीलवर तिच्या प्रियकराचे मेसेजस वाचले. मात्र त्यानंतर त्या सासूने जे केलं, त्याचा कोणीच विचार करू शकत नाही.
भेट पडली भारी
संभल येथील एक तरुण बिजनौर येथील एका महिलेशी फेसबुकवर बोलत असे. गप्पा मारता मारता मैत्री झाली आणि त्याचं रुपांतर प्रेमात झाले. महिला दिवसभर तिच्या प्रियकराशी मेसेंजरवर बोलायची पण पती येण्यापूर्वीच सर्व मेसेज डिलीट करायची. मात्र सुनेचं हे वागणं पाहून सासूला संशय आला आणि तिने सुनेचा फोन चेक केला. तेव्हा सुनेच्या अफेअरचा पर्दाफाश केला. त्यानंतर सासूने सुनेचाच आयडी वापरून त्या तरूणाला भेटायला बोलावलं आणि मग त्या दोघांची पिटाई केली.
पोलिस येण्याआधी गायब
रविवारी गजरौला येथील इंद्र चौकात एका मध्यमवयीन महिलेने तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही महिला त्या विवाहित महिलेची सासू होती, जिच्याशी तरुणाचे प्रेमसंबंध होते. सासूने तिच्या सुनेचा आयडी वापरून मेसेज करून तरुणाला भेटायला बोलावले होते. तो येताच, तिने चपलेने मारण्यास सुरूवात केली. पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले, पण तोपर्यंत सर्व जण तिकडून गायब झाले होते. अशा स्थितीत पोलिसांना त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.