क्रूझ ड्रग प्रकरणाला नवे वळण; शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचा सीसीटीव्हीही फुटेज एसआयटी टीमच्या हाती लागला आहे. त्याप्रमाणे लोअर परळमध्ये ही डिल झाल्याची माहिती समोर येतेय. या प्रकरणात किरण गोसावीने पूजा ददलानीला मदद करण्याचं आश्वासन दिलं होतं.

क्रूझ ड्रग प्रकरणाला नवे वळण; शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती
क्रूझ ड्रग प्रकरणाला नवे वळण; शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीच्या कारचे सीसीटीव्ही फुटेज एसआयटीच्या हाती


मुंबई : एनसीबी क्रूझ ड्रग प्रकरणात आता नवीन वळण आलं आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा लोअर परळमधील मर्सिडीज कारचा सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या एसआयटी टीमच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. एनसीबी क्रूझ ड्रग प्रकरणात आर्यन खानची अटक रोखण्यासाठी कथितरित्या पैशांचं झाल्याची माहिती समोर येत आहे. ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचा सीसीटीव्हीही फुटेज मुंबई पोलिसांतर्फे गठित एसआयटी टीमच्या हाती लागली. त्यामुळे ह्या प्रकरणात येणाऱ्या काळात अनेक नवीन खुलासे होणार आहेत. (A new twist to the cruise drug case; CCTV footage of Pooja Dadlani’s car in the hands of SIT)

शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचा सीसीटीव्हीही फुटेज एसआयटी टीमच्या हाती लागला आहे. त्याप्रमाणे लोअर परळमध्ये ही डिल झाल्याची माहिती समोर येतेय. या प्रकरणात किरण गोसावीने पूजा ददलानीला मदद करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र जर हे खरं असेल तर किरण गोसावीच्या विरोधात एसआयटी टिम खंडणीचा गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोसावीवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाची भांडाफोड प्रभाकर साईल याने आपल्य्या शपथपत्राच्या माध्यमातून केले होते. ज्यात त्याने आर्यन खानला अटक न करण्यासाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा खुलासा आपल्या शपथ पत्रात केला होता.

ट्रायडेंट हॉटेलमध्ये साईलला दोन बॅगा दिल्या

किरण गोसावी आणि पूजा ददलानी यांच्यात डील झाल्याचा पंच प्रभाकर साईलने आरोप लावले होते आणि सॅम डिसोझा, पूजा ददलानी आणि गोसावी यांची लोअर परळमध्ये आर्थिक डीलविषयी 3 ऑक्टोबर रोजी मिटिंग झाली होती असा गंभीर आरोप पंच प्रभाकर साईलने लावले होते. साईलच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्या रात्री गोसावीला त्याच्या वाशी येथील घरी सोडले. त्यानंतर गोसावीने साईलला ताडदेवच्या एका होटेलच्या बाहेरुन पैसे आणायला सांगितलं होतं. त्या हॉटेलच्या बाहेर एक माणूस आला आणि त्याने 2 बॅग साईलला दिल्या होत्या. जे साईलने ट्रायडेंट हॉटलमध्ये सॅम डिसोझाला दिले. मात्र ती रक्कम फक्त 38 लाख होती असा साईलच्या शपथ पत्रात उल्लेख आहे. ह्या शपथ पत्रात साईलने उल्लेख केला आहे की गोसावी आणि इतर मध्ये 25 कोटींची डील झाली होती. त्यातून 8 कोटी समीर वानखेडे यांना दिले जाणार होते असा साईलने आपल्या पत्रात दावा केला आहे. मात्र सॅम डिसोझा जो ह्या प्रकरणात मध्यस्थी होता त्याने दावा केला आहे की, ददलानीकडून 50 लाख घेतले गेले होते. मात्र नंतर ती रक्कम परत केली गेली कारण गोसावी हा फसवणूक करत असल्याच्या समोर आला.

ब्लू मर्सिडीजसह अन्य दोन गाड्या सीसीटीव्हीमध्ये कैद

सूत्रांच्या माहितीप्रमाणे एक ब्ल्यू मर्सडिजसह दोन अन्य गाड्या सीसीटीव्हीमध्ये दिसून आल्या आहेत. त्यात दोन गाड्या डिसोझा आणि गोसावीची असण्याची शक्यता आहे. एक महिला निळ्या मर्सिडीजमधून उतरताना, गोसावीशी बोलताना यात दिसते आणि नंतर दोघीही कारकडे परतत असल्याचे दिसते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोसावी, ददलानी, डिसोझा आणि यांच्यात भेट झाल्याचे दिसून येते अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस सॅम डिसोझा यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र त्याच्याशी संपर्क होत नाही आहे. या प्रकरणी पोलीस लवकरच पूजा ददलानी आणि आर्यन यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे वर्तिवली जात आहे. मात्र कसून चौकशी झाली तर अनेक नवीन आणि आश्चर्यजनक खुलासे होण्याची दाट शक्यता आहे. (A new twist to the cruise drug case; CCTV footage of Pooja Dadlani’s car in the hands of SIT)

इतर बातम्या

पालकांनो मुलांकडे लक्ष द्या! तीन वर्षांच्या लेकराने फटाका गिळला, अतिसाराने मृत्यू

Gold Price: औरंगाबादच्या सुवर्णदालनांत ग्राहकांची वर्दळ, सुबक गजान्त लक्ष्मीचे खास आकर्षण, वाचा आजचे भाव

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI