AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambarnath Crime : चेन स्नॅचिंग, ऑनलाईन फ्रॉडनंतर चक्क घरावरच धाडसी दरोडा! अंबरनाथमधील डॉक्टर दाम्पत्याला लुटलं

Ambarnath Crime News : डॉक्टर दाम्पत्याच्या तिजोरीत तब्बल 1 किलो सोनं, हिऱ्यांचे दागिने असा 1 कोटी रुपयांचा ऐवज होता.

Ambarnath Crime : चेन स्नॅचिंग, ऑनलाईन फ्रॉडनंतर चक्क घरावरच धाडसी दरोडा! अंबरनाथमधील डॉक्टर दाम्पत्याला लुटलं
हॉस्पिटलवरच दरोडा...Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 1:51 PM
Share

अंबरनाथ : आधी चेन स्नॅचिंग, मग ऑनलाईन फ्रॉड आणि आता तर चक्क दरोडा घालण्याचा धक्कादायक प्रकार एका डॉक्टर दाम्पत्यासोबत घडलेला आहे. अंबरनाथमधील (Ambarnath Crime News) नामांकित डॉक्टर हरीश लापसिया यांच्या घरावर काल रात्री 4 दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. या दरोड्यात घरातील तब्बल 1 कोटी रुपयांचे सोनं आणि हिऱ्यांचे दागिने दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत लुटून (Ambarnath Robbery) नेले. अंबरनाथच्या कानसई परिसरात डॉक्टर हरीश आणि उषा लापसिया यांचं उषा नर्सिंग होम नावाचं हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलचाच वरच्या मजल्यावर डॉक्टर लापसिया यांचं घर आहे. सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास चार सशस्त्र दरोडेखोर या हॉस्पिटलमध्ये घुसले. त्यांनी तिथे असलेल्या नर्स आणि आया यांना चाकूचा धाक दाखवत त्यांचे मोबाईल (Mobile Phone) काढून घेतले आणि त्यांना पेशंटच्या खोलीत कोंडून ठेवलं. त्यानंतर दरोडेखोरांनी वरच्या मजल्यावरील डॉक्टर लापसिया यांच्या घरात जाऊन थेट कपाटातील दागिने चोरायला सुरुवात केली. यावेळी डॉक्टर हरीश लापसिया हे त्यांच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होते, तर उषा लापसिया या त्यांच्या बेडरूममध्ये झोपल्या होत्या. त्यांना दरोडेखोरांची चाहूल लागताच त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरोडेखोरांनी त्यांचं तोंड दाबत चाकूचा धाक दाखवला आणि कपाटातील डिजिटल तिजोरी काढून घेऊन गेले.

तब्बल 1 कोटी लुटले!

डॉक्टर दाम्पत्याच्या तिजोरीत तब्बल 1 किलो सोनं, हिऱ्यांचे दागिने असा 1 कोटी रुपयांचा ऐवज होता. दरोडेखोरांनी जाताना सीसीटीव्हीचा डिव्हीआर काढून नेला आणि हॉस्पिटलच्या दाराला बाहेरून कडी लावली. यानंतर उषा लापसिया यांनी आरडाओरडा करून शेजाऱ्यांना याची माहिती देताच शेजारी मदतीला धावले आणि सर्वांची सुटका केली.

पोलिसात गुन्हा

या घटनेप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सशस्त्र दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून या दरोड्याचा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

आधी चेन स्नॅचिंग, मग ऑनलाईन फ्रॉड.. आणि आता दरोडा

डॉक्टर उषा लापसिया यांच्यासोबत यापूर्वी जून महिन्यात चेन स्नॅचिंगची घटना घडली होती. तर त्यानंतर त्यांच्यासोबत ऑनलाईन फ्रॉडचाही प्रकार जून महिन्यातच घडला होता. यानंतर आता त्यांच्या घरी दरोडा पडल्यानं एखाद्या माहितीतल्याच व्यक्तीचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होतेय.

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.