AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Naik : गणेश नाईक हायकोर्टात जाण्याच्या तयारीत? नॉटरिचेबल गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार

Ganesh Naik : डीएनए टेस्ट करावी आणि नाव देण्यात यावं, अशी मागणी पीडित महिलेनं केली आहे.

Ganesh Naik : गणेश नाईक हायकोर्टात जाण्याच्या तयारीत? नॉटरिचेबल गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार
गणेश नाईक, नेते, भाजपImage Credit source: TV9
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 02, 2022 | 8:58 AM
Share

नवी मुंबई : आमदार गणेश नाईकांचा (BJP MLA Ganesh Naik) जामीन अर्ज ठाणे सत्र न्यायालयाने (Thane session court) फेटाळला होता. त्यानंतर आता ते उच्च न्यायालयात (High court) जाण्याची शक्यता आहे. तसेच पीडित महिलेलची व तिच्या वकिलाची उच्च न्यायालयात जाण्याची तयारी असल्याचीही मिळतेय. डीएनए टेस्ट करावी आणि नाव देण्यात यावं, अशी मागणी पीडित महिलेनं केली आहे. दरम्यान, अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आमदार गणेश नाईक अजूनही नॉटरिचेबल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटकेची टांगती तलवार असूनदेखील नवी मुंबई पोलीस त्यांना का अटक करत नाही, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढल्यात. ठाणे न्यायालयानं गणेश नाईकांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर आता त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असं सांगितलं जातंय. बलात्कार आणि महिलेला धमकावल्याप्रकरणी भाजप आमदार गणेश नाईक यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठीअर्ज केला होता. यावर शनिवारी सुनावणी पार पडली होती. कोर्टानं हा जामीनअर्ज फेटाळल्यामुळे आता गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ झालीये.

…म्हणून जामीन नाही!

नाईक यांना जर जामीन दिला, तर ते तक्रारदार महिलेवर दबाव टाकू शकतात, अशी भीती सरकारी वकिलांनी यावेळी व्यक्त केली होती. तसंच त्यांच्याकडे असलेल्या रिव्हॉल्वरहचा ताबा पोलिसांना मिळणे गरजेचं अशल्याचाही युक्तीवाद करण्यात आला होता. सरकारी वकिलांचा युक्तिवाद रास्त मानत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयानं गणेश नाईकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलेला.

पीडित महिलेचे गंभीर आरोप

भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या दीपा चव्हाण यांनी आपल्या जीविताला धोका असल्याचं म्हटलं होतं. नाईक यांना जामीन मिळाल्यास माझं अपहरण होऊ शकतं तसेच माझ्याकडून जबरदस्तीने काही लिहून घेतलं जाऊ शकतं, असाही आरोप पीडित महिलेनं केला होता.

आता हायकोर्टात दाद मागणार?

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये गेली 27 वर्ष एका महिलेसोबत राहत तिच्यावर अत्याचार केल्याचा आणि तिला धमकावल्याचा आरोप गणेश नाईक यांच्यावर करण्यात आलाय. नवी मुंबईतल्या दोन वेगवेगल्या पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेलाय. या दोन्ही गुन्ह्यासंदर्भात अटकपूर्व जामीन मिळावा, अशी मागणी नाईक यांनी अर्जाद्वारे केली होती. जिल्हा सत्र न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावल्यानंतर आता गणेश नाईक हायकोर्टात दाद मागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर