AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांदिवलीत तरुणाची निर्घृण हत्या; चौघा आरोपींनी चाकूने 20 वार करून मृतदेह फेकून दिला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबरला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हे धक्कादायक हत्याकांड घडले आहे. परस्पर वैमनस्यामुळे 22 वर्षीय तरुणाला चार लोकांनी चाकूने सपासप वार करून संपवले.

कांदिवलीत तरुणाची निर्घृण हत्या; चौघा आरोपींनी चाकूने 20 वार करून मृतदेह फेकून दिला
कांदिवलीत तरुणाची निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Sep 25, 2021 | 10:49 PM
Share

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात काही प्रमाणात थंडावलेली गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढू लागली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरीतील कांदिवलीत घडलेल्या तरुणाच्या हत्याकांडाने प्रचंड खळबळ उडाली आहे. चार आरोपींनी परस्पर वैमनस्यामुळे 22 वर्षीय तरुणाची चाकूने सपासप 20 वार करून हत्या केली आणि मृतदेह दुसऱ्या ठिकाणी फेकून दिला. हत्याकांडानंतर आरोपी पसार झाले. कांदिवली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला गती दिली आणि चारही आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. (Brutal murder of a youth in Kandivali; The four accused stabbed 20 times and threw the bodies)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 सप्टेंबरला पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हे धक्कादायक हत्याकांड घडले आहे. परस्पर वैमनस्यामुळे 22 वर्षीय तरुणाला चार लोकांनी चाकूने सपासप वार करून संपवले. या प्रकरणाच्या तपासादरम्यान असे आढळून आले की सर्व मारेकरी मृत तरुणाच्या ओळखीतीतील आहेत. ते फरार झाले असून घटनास्थळावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली. तांत्रिक मदतीने पोलिसांनी चार आरोपींना अवघ्या 12 तासांत मुंबई आणि परिसरातून अटक केली.

पूर्ववैमनस्यातून हत्याकांड

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितले की, मृत तरुण आणि आरोपींमध्ये परस्पर वैर होते. त्यांच्यामध्ये यापूर्वीही भांडणे झाली होती. याच भांडणाचा बदला आरोपींकडून घेण्यात आला. 23 सप्टेंबरच्या पहाटे संधी मिळताच मुख्य आरोपीने मृत तरुणाला पकडले आणि त्याच्यावर चाकूने 20 वार करून त्याला ठार मारले. आरोपींनी यापूर्वी मृत तरुणाचा गळा दाबून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मृत तरुणाचे नाव अन्वर बाबू सय्यद असे असून तो 22 वर्षांचा होता.

अवघ्या 12 तासांमध्ये आरोपींना अटक

कांदिवली पोलिसांनी त्याच्या निर्घृण हत्येप्रकरणी व्यंकटेश राजमणी मुरलीधर उर्फ आंबा, राजमणी प्रकाश मुरलीधर, विनायक जितेंद्र चौहान उर्फ बाबू, आकाश श्रावण विश्वकर्मा या चौघा आरोपींना अटक केली आहे. मुंबई व आसपासच्या परिसरातून या सर्व आरोपींना घटना घडल्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत जेरबंद करण्यात आले. मुंबई पोलिसांच्या झोन 11 चे डीसीपी विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. (Brutal murder of a youth in Kandivali; The four accused stabbed 20 times and threw the bodies)

इतर बातम्या

प्रियकराच्या घरच्यांचा विरोध; अनाथ मुलीचे पोलीस निरीक्षकाने लावून दिले लग्न

उस्मानाबादेत मांडूळाच्या तस्करीचा कट उधळला; 6 तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.